शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी, शिष्यवृत्तीची लिंक वेगळी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:56 IST

शासन सध्या शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घेत आहे. तर त्याचवेळी विद्यार्थ्यांचीही शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना गोंधळ उडत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची मागणी : व्हीबीव्हीपीचे घाटंजी तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शासन सध्या शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घेत आहे. तर त्याचवेळी विद्यार्थ्यांचीही शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना गोंधळ उडत आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी वेगवेगळी आॅनलाईन लिंक करावी, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने (व्हीबीव्हीपी) केली आहे.या मागणीसाठी गुरूवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर आहे. शेतीची कामे, मजुरी सोडून त्यांना अर्ज भरण्यासाठी रांगेत राहावे लागत आहे. इंटरनेटची समस्या येत असल्याने शेतकºयांचे बेहाल सुरू आहे. त्यांच्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर फॉर्म भरण्याची सुविधा द्यावी, स्वतंत्र लिंक द्यावी, त्यांच्या थम्बमध्ये येणाºया अडचणी दूर कराव्या अशी मागणी करण्यात आली. दुसरीकडे, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. तो मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसापासून आधार सेंटर बंद होते. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून अनेक जण वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आधार कार्ड सेंटर देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.नायब तहसीलदार गजभिये यांना निवेदन सोपविताना वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास निकम, तालुकाध्यक्ष अनिल बावने, तालुका सचिव रोशन आडे, राकेश कत्तलवार, पंकज आडे, आशुतोष चौधरी, जियाताई चौरीवार, रोशनी डुकरे आदी उपस्थित होते.