शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक; आदिशक्तीची आराधना होत असतानाच युवतीवर अमानुष अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 21:37 IST

Yawatmal News शहरात गेल्या नऊ दिवसांपासून आदिशक्तीचा जागर सुरू आहे. अशा वातावरणातच एका नराधमाने स्वत:च्या बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केला. तिला बेशुद्ध करून अनोळखी ठिकाणी नेऊन जिवघेणी मारहाण केली.

ठळक मुद्देअपहरण करून पीडितेला मारहाण

यवतमाळ : शहरात गेल्या नऊ दिवसांपासून आदिशक्तीचा जागर सुरू आहे. अशा भक्तिमय वातावरणातच एका नराधमाने स्वत:च्या बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केला. तो यावरच थांबला नाही. त्याने तिला बेशुद्ध करून अनोळखी ठिकाणी नेऊन जिवघेणी मारहाण केली. नंतर घरी आणून सोडून दिले. शुक्रवारी सकाळी पीडितेचे वडील घरी आल्यानंतर हा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला.

अक्षय शरद बगमारे उर्फ बागा (२५) रा.जामनकरनगर असे नराधमाचे नाव आहे. अक्षयने अल्पवयीन असतानाच गंभीर गुन्हे केले आहे. यवतमाळातील अक्षय राठोड टोळीच्या तो सतत संपर्कात असायचा. त्याच्या बहिणीची मैत्रिण असलेल्या मुलीलाच त्याने आपल्या वासनेची शिकार बनविले. घरात आईचा कॅन्सरने मृत्यू झालेला. त्याच धसक्यात मोठी बहीणही दगावली. वडील व ती असे दोघेच घरी राहात होते. याचाच फायदा घेऊन आरोपी अक्षयने तिला वडिलांना ठार करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन-तीनवेळा बळजबरी केली.

गुरुवारी रात्री २ वाजता अक्षय तिच्या घरी पोहोचला. तेव्हा तो दारूच्या नशेतच होता. त्याने पुन्हा तिच्यावर बळजबरी केली. नंतर तिला बेशुद्ध केले. तेथून तिला अनोळखी ठिकाणी घेऊन गेला. त्याठिकाणी दोन साथीदारांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. तिला बेदम मारहाण करण्यात आली. शुद्धीवर आल्यानंतर ऑटोत बसून घरी सोडून दिले. ड्युटीवरून परत आलेल्या वडिलांना शुक्रवारी सकाळी हे दृश्य दिसले. भीतीपोटी ती काहीच बोलायला तयार नव्हती. तिच्या तोंडातून रक्त सांडत होते. संपूर्ण शरीरावर, गुप्तांगावर मारहाणीच्या गंभीर जखमा होत्या. अशाही स्थितीत भीतीमुळे तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. अखेर तिच्या वडिलाने पोलीस नातेवाइकाच्या मदतीने धीर देत विचारपूस केली. तेव्हा अक्षय बगमारे याने हे कृत्य केल्याचे सांगितले.

आता तिची प्रकृती गंभीर असून शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. संपूर्ण शहर आई जगदंबेच्या आराधनेत लीन असतानाच हा नीच प्रकार घडला. अवधूतवाडी पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून अक्षय शरद बगमारे उर्फ बागा याच्यावर ३७६ (२)(एन), ३२३, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार झाले असून अवधूतवाडी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग