शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

‘ठिबक’चे अडले सात कोटी

By admin | Updated: September 1, 2015 03:02 IST

बेंबळा प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर डेहणी उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. प्रकल्पाच्या माध्यमातून सहा हजार हेक्टरवर

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ बेंबळा प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर डेहणी उपसा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. प्रकल्पाच्या माध्यमातून सहा हजार हेक्टरवर ओलित करण्यात येणार होते. प्रत्यक्षात २१० हेक्टरवरपर्यंतच साध्य पूर्ण झाले आहे. अनेक झोनमध्ये अद्यापही पाणीच पोहचले नाही, असा आरोप शेतकरी करीत आहेत. या प्रकल्पासाठी आलेला सात कोटींचा निधी लोकवर्गणीअभावी थांबला. परिणामी, ड्रिपच्या कामाला गतीच मिळाली नाही. यातून महत्त्वाकांक्षी योजनेला खिळ बसली आहे.डेहणी उपसा सिंचन योजनेतून मोठ्या प्रमाणात ओलित करता यावे म्हणून या योजनेसाठी विशेष बाब म्हणून सात कोटी मंजूर झाले. हा निधी कृषी विभागाने पाटबंधारे विभागाकडे वळता केला. मात्र पाटबंधारे विभागाने याबाबत कुठलेही गांभीर्य दाखविले नाही. यामुळे ठिबक सिंचन योजनची माहिती परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारी लोकवर्गणी गोळा झाली नाही. यातूनच सात कोटींचा निधी अडकला. या योजनेत शेतकऱ्यांना १० टक्के रक्कम सक्तीची होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. प्रत्यक्षात पाणी केवळ २१० हेक्टरमध्ये पोहोचले.सहा हजार हेक्टरवर ओलित होणार असल्याचा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रयोग राज्यात अभिनव ठरेल, असा विश्वास यवतमाळ भेटीत व्यक्त केला. प्रत्यक्षात या कामाला गती देण्यासाठी आजपर्यंत स्थानिक पातळीवर प्रयत्न झाले नाही. ड्रिप करण्यासाठी पाईपखरेदी करण्यात आली. अनेक वर्षांपासून हे पाईप उन्हात पडून आहेत. आता पाईपचे तुकडे पडत आहेत. हे पाईप भविष्यात कामी येण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत हे पाईप दिसू नये म्हणून या ठिकाणी पांढरा पडदा लावण्यात आला होता. बॅक वॉटरवरून पाण्याचा उपसा करायचा आणि तो शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी १९ झोन तयार करण्यात आले आहे. त्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, अनेक झोनमध्ये अद्यापही पाणी पोहचले नाही. काही भागात आजही अडचणी आहे. यातून मोजकेच ओलित होत आहे. डेहणी प्रकल्पस्थळी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले. या केंद्राचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही, असे स्पष्ट मत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याकडे नोंदविले. निधी परत गेल्याची अफवा ४डेहणी प्रकल्प क्षेत्रात ठिबक सिंचनासाठी कृषी विभागाने पाटबंधारे विभागाकडे सात कोटी वळते केले. तो निधी खर्च झाला नाही. यामुळे हा निधी परत जाणार, अशी अफवा परिसरात पसरली आहे. पाटबंधारे विभागाने हा निधी परत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या पिकांचा अ‍ॅक्शन प्लॅन नाही४मुख्यमंत्र्यांनी डेहणी उपसा सिंचन योजनेच्या भेटी दरम्यान प्रकल्प अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी कुठले पीक घेतले जात आहे, असे विचारण्यात आले. त्यावर लगेच उत्तर आले, कापूस, सोयाबीन. यामुळे मुख्यमंत्री आश्चर्यचकीत झाले. त्यांनी नव्या पीकाबाबत अ‍ॅक्शन प्लॅन केला का, असे विचारले. त्यावर अधिकाऱ्यांना उत्तरच देता आले नाही. मुख्यमंत्री जाताच त्यावर तत्काळ अंमलबजावणी व्हायला हवी.६०० हेक्टरवर ड्रिपचे प्रयत्न४पहिल्या टप्प्यात दोन हजार हेक्टरवर ड्रिप टाकले जाणार आहे. त्यातील २१० हेक्टरवर सिंचन सुरू झाले आहे. ६०० हेक्टरवर पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. त्याची लोकवर्गणी गोळा झाली आहे.ड्रिप टाकण्यासाठी १० टक्के लोकवर्गणीची अट आहे. सहा हजार हेक्टरमधून दीड कोटी गोळा केले जाणार आहे. सध्या ६०० हेक्टरची लोकवर्गणी गोळा करण्यात आली. त्याचे काम सुरू आहे. पाईपची गुणवत्ता तपासल्यानंतर पाईप योग्य असतील, तरच त्याचा वापर होईल. कामाला गती मिळावी या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.- राजेंद्र काटपल्लीवार, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, यवतमाळ