शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

समूहाने पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे

By admin | Updated: February 7, 2017 01:26 IST

शेतकऱ्यांना अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळावे म्हणून महाबीज कंपनीने पावले उचलली आहेत.

महाबीजचा पुढाकार : कृषी विभागाला नवीन गावात परमिट देण्याचे आदेशयवतमाळ : शेतकऱ्यांना अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळावे म्हणून महाबीज कंपनीने पावले उचलली आहेत. याकरिता कृषी विभागाला नवीन गावात भुईमूग बियाण्याचे परमिट देण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी ५० ते १०० शेतकऱ्यांना समूहात कृषी विभागाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे. त्यादृष्टीने आणखी काही बियाणे महाबीज कंपनी जिल्ह्याकडे वळते करणार आहे.भुईमुगाच्या पेरणीकरिता जिल्ह्याकडे सहा हजार क्विंटल बियाणे वळते झाले. यातील पाच हजार क्विंटल बियाण्यांचो वाटप झाले तर, बाराशे क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. परमिट उचलणाऱ्या काही शेतकऱ्यानी अद्यापही बियाणे उचलले नाही. त्यांना बुधवारपर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणात बियाण्यांची मागणी आहे, त्यानुसार उपलब्ध बियाण्यांचे वाटप झाले असले तरी आवश्यक ते बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांच्या गटांकडून मागणी नोंदविणे आवश्यक आहे. दरम्यान, अनेक गावातून भुईमुगाच्या बियाण्याची मागणी येत आहे. मात्र अशी गावे यादीत नाही. यामुळे अशा गावांचा नव्याने प्रस्ताव स्वीकारला जाणार आहे. याकरिता ५० ते १०० शेतकऱ्यांनी समूहाने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे बियाण्यांच्या योजनेत नाव नोंदविण्याची मागणी करायची आहे. तत्काळ या शेतकऱ्यांना परमिट दिले जाणार आहे. एका शेतकऱ्याला दोन बियाण्याच्या बॅग अनुदानावर दिल्या जाणार आहे. यामुळे आर्थिक अडचणित सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार परमिटांचे वितरण करण्यात आले आहे. यातील पाच हजार क्विंटल बियाण्यांची उचल शेतकऱ्यांनी केली आहे. तर एक हजार क्विंटल बियाण्यांचे परमिट शेतकऱ्यांनंी अद्यापही कृषी सेवा केंद्रांकडे सादर केले नसल्याची माहिती आहे. असे परमिट रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहे. (शहर वार्ताहर)महाबीज घेणार दखलमहाबीज कंपनी अनुदानावर बियाणे देत आहे. मात्र तालुका कृषी कार्यालयातून अनेक गावांना परमिट आधीच वाटले असे सांगत परत केले जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाबीज कंपनीने अशा प्रकरणात नव्याने बियाणे जिल्ह्याकडे वळते करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही नव्याने परमिट न मिळाल्यास महाबीजकडे तक्रार करण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप देशमुख यांनी केले आहे.