शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे बाजारातील उलाढाल ठप्प

By admin | Updated: June 11, 2014 00:17 IST

कोट्यवधीची उलाढाल असणारा बियाणे बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी बियाणे खरेदीसाठी प्रचंड अनुत्सूक आहे. आतापर्यंत केवळ २० टक्केच बियाण्यांची विक्री झाली असून

केवळ २० टक्के विक्री : लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनाज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ कोट्यवधीची उलाढाल असणारा बियाणे बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी बियाणे खरेदीसाठी प्रचंड अनुत्सूक आहे. आतापर्यंत केवळ २० टक्केच बियाण्यांची विक्री झाली असून गतवर्षी याच काळात ८० टक्के बियाणे विकले होते. पावसाला प्रारंभ झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी वाढण्याची आशा आहे. गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि रबी हंगामात गारपिटीत शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. घेतलेले बँकांचे कर्जही परतफेड करू शकला नाही. परिणामी नवीन कर्ज मिळण्यात अडचण येत आहे. हातात पैसा नाही आणि कर्जही मिळत नाही, अशा विवंचनेत शेतकरी आहे. खरीप हंगामासाठी मशागत करून शेती सज्ज आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्र उलटून तीन दिवस झाले तरी कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही बी-बियाणे खरेदी करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कृषी केंद्र ओस दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख २०० हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यात कपाशी तीन लाख ८६ हजार हेक्टर, सोयाबीन तीन लाख ८९ हजार हेक्टर, तूर ९० हजार हेक्टरवर पेरा होणार आहे. कृषी केंद्रचालकांनी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे बुकींग केले. कपाशी, सोयाबीनच्या बियाण्यांनी कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र खरेदीसाठी शेतकरीच दिसत नाही. यवतमाळच्या मेटीखेडा कृषी केंद्राचे संचालक नितीन सरोदे म्हणाले, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांपासून शेतकरी कृषी केंद्रात दिसत आहे. त्यांना बियाण्यांचे भाव कमी होण्याची आशा आहे. सध्या शेतकरी केवळ खत खरेदी करीत आहे. नेर येथील आदर्श कृषी केंद्राचे संचालक शबीर मकवाणी म्हणाले, शेतकरी बी-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. पाऊस कोसळल्यानंतर गर्दी वाढेल. वणी येथील अभय कृषी केंद्राचे संचालक अभय कटकमवार म्हणाले, यंदा शेतकऱ्यांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत नाही. बियाण्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षा आहे. तसेच कृषी केंद्र चालकांची उधारीवर माल देण्याची तयारी नाही. त्यामुळे बाजारात गर्दी कमी आहे. यवतमाळ येथील अजय कृषी केंद्राचे संचालक अजय येरावार म्हणाले, प्रत्येक शेतकरी दुकानदाराला बियाण्यांची गॅरंटी मागत आहे. बियाणे सर्टिफाईड असल्याचे प्रमाणपत्र असल्याने आम्ही गॅरंटी घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.