शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या

By admin | Updated: February 20, 2017 01:22 IST

दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि १२ गणांच्या प्रचाराचा धुरळा रविवारी रात्री शांत झाला.

मंगळवारी मतदान : आता केवळ छुपा प्रचार, ६ गट आणि १२ गणयवतमाळ : दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि १२ गणांच्या प्रचाराचा धुरळा रविवारी रात्री शांत झाला. आता उमेदवार व कार्यकर्त्यांना जोर छुप्या प्रचारावर राहणार आहे.गटांच्या आरक्षणावरून प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे सहा गट व त्याअंतर्गत येणाऱ्या १२ गणांची निवडणूक लांबणीवर पडली होती. नवीन आरक्षणानंतर या गट व गणांसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठीचा जाहीर प्रचार रविवारी रात्री १० वाजता समाप्त झाला. आता सर्व उमेदवार व कार्यकर्ते रविवार व सोमवारच्या रात्री छुप्या प्रचारावर जोर देणार आहे. या दोन रात्रीतून त्यांना विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.या टप्प्यात कुंभा-मार्डी, घोन्सा-कायर, देऊरवाडी-सुकळी, वटफळी-अडगाव, लाडखेड-वडगाव आणि विडूळ-चातारी या गटात मतदान घेतले जाणार आहे. त्यापैकी देऊरवाडी-सुकळी गटात सहा, तर दोन गणात १२, लाडखेड-वडगाव गटात सहा व दोन गणात १२, वटफळी-अडगाव गटात पाच, तर दोन गणात १३, विडूळ-चातारी गटात चार, तर दोन गणात सात, घोन्सा-कायर गटात सात, तर दोन गणात १० आणि कुंभा-मार्डी गटात एका जागेसाठी सहा, तर पंचायत समितींच्या दोन जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही टप्प्यातील मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. (शहर प्रतिनिधी)निकालाची उत्सुकता शिगेलापहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. उमेदवार आणि नेते विजयाचे दावे ठोकत आहे. मात्र मतदार राजा आपले कर्तव्य जावून तूर्तास चुप्पी साधून आहे. त्यांनी कुणाला कौल दिला, हे २३ फेब्रुवारीलाच कळणार आहे.