शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माफीची दुसरी यादी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:40 IST

रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमत यवतमाळ : कर्जमाफीची घोषणा होऊन महिना लोटला. आता दुसरी यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही जमा झाला नाही. या दोन्ही आता चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी एकूण तीन लाख ४० हजार अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरले होते. त्यापैकी दोन लाख ४० हजार शेतकऱ्यांना दोन हजार ...

ठळक मुद्देकर्जाचा छदामही जमा नाही : दोन्ही याद्या चौकशीच्या फेऱ्यात

रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमत यवतमाळ : कर्जमाफीची घोषणा होऊन महिना लोटला. आता दुसरी यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही जमा झाला नाही. या दोन्ही आता चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी एकूण तीन लाख ४० हजार अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरले होते. त्यापैकी दोन लाख ४० हजार शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. उर्वरित एक लाख अर्ज छाननीत बाद झाले. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकडो यातना सहन केल्या. मात्र अर्ज पात्र ठरूनही त्यांच्या खात्यात कर्जमाफीचा छदामही जमा झाला नाही. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे.गेल्या १८ आॅक्टोबरला नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्यातील ३१ शेतकºयांना त्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले गेले. त्यांचे कर्ज ‘निल’ झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या ३१ शेतकºयांच्या खात्यातही पैसे जमा झाले नाही. नंतर २३९७ शेतकºयांची पहिली ग्रीन यादी आली. त्यासाठी १४ कोटी ३० लाख बँकेकडे वळते करण्यात आले. मात्र सहकार विभागाने ग्रीन यादीचीच फेर चौकशी सुरू केली. ती अद्याप संपली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच आले नाही.पहिल्याच यादीचा घोळ सुरू असताना बुधवारी शासनाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एक हजार शेतकºयांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र ही यादीही सदोष आहे. त्यामुळे आता या यादीतील नावांची फेरतपासणी सुरू करण्यात आली आहे.या यादीत शेतकºयांकडे नेमके किती कर्ज आहे, याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. आता पहिली आणि दुसरी यादी चौकशीतच आहे. दोन्ही याद्या चोफकशीच्या फेºयात सापडल्याने शेतकºयांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील, याबाबत साशंकता वाढली आहे.राष्ट्रीयीकृत बँकांची तर यादीच नाहीजिल्हा बँकेच्या दोन याद्या प्रसिद्ध झाल्या. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या अद्यापही प्रसिद्ध झाल्या नाही. ग्रामीण बँकेच्या याद्याही लागल्या नाही. यामुळे शेतकरी गोंधळाच्या स्थितीत सापडले आहे.जिल्हा बँकेची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. त्याची शहानिशा सुरू आहे. पहिल्या यादीची चौकशी अपूर्ण आहे. चौकशीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल.- अरविंद देशपांडेसीईओ, जिल्हा सहकारी बँक, यवतमाळ