शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

दोन व्यापाऱ्यांकडे ‘आयकर’चा सर्च

By admin | Updated: November 1, 2014 01:13 IST

कर चुकविल्याच्या (चोरी) संशयावरून आणि गोपनीय माहितीवरून यवतमाळातील दोन व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सर्च घेतला.

यवतमाळ : कर चुकविल्याच्या (चोरी) संशयावरून आणि गोपनीय माहितीवरून यवतमाळातील दोन व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सर्च घेतला. त्यामध्ये संबंधित व्यापाऱ्यांची घरे आणि कार्यालयांची झडती घेण्यात आली. सकाळी १० वाजतापासून सुरु झालेली ही कारवाई वृत्त लिहिस्तोवर सुरूच होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी दोन व्यापाऱ्यांकडे आयकरने सर्च केला होता. आठवड्यात ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे येथील स्थानिक व्यापाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. भरत दत्ताणी आणि विपूल पटेल दोघेही रा. चर्च रोड असे सर्च झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. त्यांचे दोघांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. व्यवसायातील उत्पन्न कमी दर्शवून त्यांनी मोठ्या प्रमाणात आयकर चुकविल्याची गोपनीय माहिती नागपूर आणि यवतमाळ येथील आयकर विभागाकडे होती. त्यावरून संयुक्त पथकाने भरत दत्ताणी यांच्या चर्च रोडवरील घरी आणि स्टेट बँक चौकातील सुपर बाजार मार्केटमधील कार्यालयात तर विपूल पटेल यांच्या चर्च रोडवरील घर आणि कार्यालयात एकाचवेळी सर्च राबविला. यावेळी महत्वाचे दस्तावेज आणि संगणकातील माहितीची पथकाने बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये काही महत्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले. सकाळी १० वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने दिवाळीच्या पूर्व संध्येला येथील सराफा बाजारातील शाह आभूषण आणि शाह ज्वेलर्समध्ये सर्च राबविला होता.आठवडाभरात संयुक्त पथकाव्दारे ही दुसरी प्रभावी कारवाई आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये या कारवाईने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तलिहिस्तोवर सर्च सुरच होता. (स्थानिक प्रतिनिधी)