शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अखेर उमरखेडला स्वतंत्र एसडीपीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 20:48 IST

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर उमरखेडला स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपुणे ‘इंटेलिजन्स’ची टीम उमरखेडमध्ये

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर उमरखेडला स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. गृहविभागाने मंगळवार २५ जुलै रोजी या संबंधीचे आदेश जारी केले. आता जिल्ह्यात एकूण सहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये झाली आहेत.आतापर्यंत उमरखेड परिसर पुसद उपविभागात समाविष्ठ होता. परंतु पुसदकडील व्याप आणि उमरखेड परिसराची संवेदनशीलता लक्षात घेता उमरखेडला स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्थापन करण्याची मागणी जिल्हा पोलीस दलाकडून केली जात होती. यासंबंधी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने २९ एप्रिल २०१७ ला महासंचालक कार्यालयाकडे प्रस्तावही सादर केला होता. अखेर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यासंबंधीचे आदेश २५ जुलै रोजी जारी करण्यात आले. आता उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत दराटी, बिटरगाव, महागाव, पोफाळी आणि उमरखेड या पाच पोलीस ठाण्यांचा समावेश राहणार आहे. तर खंडाळा, वसंतनगर, पुसद शहर व पुसद ग्रामीण हे चार पोलीस ठाणे पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत समाविष्ठ राहतील.३१ पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वणी, पांढरकवडा, यवतमाळ, दारव्हा, पुसद हे पाच पोलीस उपविभाग आहेत. त्यात आता उमरखेडची भर पडल्याने ही संख्या सहा झाली आहे.पांढरकवड्याचे पद उमरखेडलापांढरकवडा येथील शासनाच्या ४ मार्च २०१४ च्या निर्णयानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राकरिता पोलीस उपअधीक्षकाची २० पदे मंजूर आहेत. त्यातील एक पद उमरखेड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून स्थानांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.स्वतंत्र एसडीपीओंची पार्श्वभूमीपुसद व उमरखेड ही दोनही शहरे अतिसंवेदनशील मानली जातात. या तालुक्यांच्या लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या भागात नेहमीच लहान मोठ्या जातीय दंगली घडतात. पूर्वीच्या पुसद उपविभागात नऊ पोलीस ठाणे आहेत. त्यापैकी सात पोलीस ठाण्यांचे पुसदपासूनचे अंतर सुमारे ७० किलोमीटरचे आहे. पर्यायाने पुसद एसडीपीओ कार्यालयावर कामाचा ताण वाढतो. कायदा व सुव्यवस्था राखतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच पुसदचे विभाजन करून उमरखेड या स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या स्थापनेची मागणी होती. ही मागणी मंगळवारी मंजूर झाली आहे.पुणे ‘इंटेलिजन्स’ची टीम उमरखेडमध्येराज्य गुप्तवार्ता विभागाच्या (स्टेट इंटेलिजन्स) पुणे येथील कार्यालयाची एक चमू मंगळवारी उमरखेडमध्ये दाखल झाली. उपअधीक्षक लगडे व अन्य दोन पोलीस निरीक्षकांचा समावेश असलेल्या या चमूने उमरखेडला जाण्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तेथील अतिसंवेदनशीलतेवर चर्चा केल्याचे सांगितले जाते. आगामी गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी आतापासूनच तयारी चालविली असून इंटेलिजन्सच्या टीमची उमरखेड भेट व मुक्काम हा या तयारीचाच भाग असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीला उमरखेड येथे गालबोट लागले होते. तत्कालीन ठाणेदाराला हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती. त्या घटनेचे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी आतापासूनच सावधगिरी बाळगल्याचे दिसते.