शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिकारांनीच गणरायाला सोडले उघड्यावर

By admin | Updated: September 7, 2016 01:39 IST

कलेची उपासना करणारे कलावंत आपण पाहिले आहेत. कलेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते जीवाचे रान करतात.

यवतमाळ : कलेची उपासना करणारे कलावंत आपण पाहिले आहेत. कलेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते जीवाचे रान करतात. कलेलाच देवता मानणारे कारागीर आपल्या कलेला जिवंत रूप देऊन साऱ्यांचेच लक्ष वेधतात. यामुळे कलेचे वाट्टेल ते मोल देऊन कलाप्रेमी वस्तू खरेदी करतो. या केलेच्या क्षेत्रात जर व्यावसायिकतेने घुसखोरी केली तर कलेचे मोल शून्य होते. मग साक्षात ईश्वर पुढे असला तरी त्याला ओलांडून पुढे जाण्यास असे व्यावसायिक मागे-पुढे पाहात नाही. याचाच प्रत्यय गणशे चतुर्थीच्या अनुषंगाने यवतमाळकरांना आला. गणेश चतुर्थीचा दिवस संपताच गणरायाच्या मूर्ती विकल्या जाणार नाही. यामुळे व्यावसायिकांनी न विकल्या गेलेल्या मूर्ती उघड्यावर सोडून रात्रीतूनच पोबारा केला. आपल्या व्यावसायिक स्वार्थी वृत्तीचे यवतमाळकरांना दर्शन घडविले. कारागिरांच्या नावावर व्यावसाय करणाऱ्या उद्योजकांची गर्दी अलीकडे वाढत आहे. यातून चार पैसे जास्त मिळतात. वर्षभर कुठलेही काम करावे लागत नाही. यामुळे या क्षेत्रात रस असणारे आणि रस नसणारे व्यावसायिक मूर्तिकार दिसतात. या मूर्तिकारांनी खोटे बोलण्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. यातून यवतमाळात मूर्तिकलेलाही गालबोट लागले आहे. विघ्नहर्त्याला घडविण्यासाठी पुरेशी लाल माती मिळाली नाही. असे असले तरी प्रत्येक मूर्तिकार आपली मूर्ती लाल मातीची असल्याचे ठामपणे सांगत होता. तर काहींनी आपल्या गणरायाची मूर्ती शाडूमातीची असल्याची थाप गणेशभक्तांना मारली. हा त्यांचा खोटारडेपण धंद्यासाठी होता. याचे वास्तव गणेश स्थापनेनंतर काही तासातच उघड झाले. अधिक नफा मिळवून व्यवसाय कॅश करण्यासाठी व्यावसायिक मूर्तिकारांनी लाल माती आणि शाडूमातीच्या नावाखाली प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती भक्ताच्या माथी मारल्या. या मूर्ती अधिक नाजूक होत्या. यामुळे त्याचा थोडासा धक्का लागला तरी त्याचे हात, बोट, चेहरा, पाय तुटला. ज्या मूर्ती खंडित होतात, अशा मूर्तीची स्थापना केली जात नाही. यामुळे भक्तांनी या मूर्ती खरेदी केल्या नाही. मुळात व्यावसाय करण्यासाठी बसलेल्या मूर्तिकारांनी अशा मूर्तीचे ओझे कुठे घेऊन जायचे म्हणून या मूर्ती उघड्यावर टाकल्या. त्या मूर्ती लाल मातीच्या नव्हत्या. तर पूर्णत: प्लास्टर आॅफ पॅरिसच्या होत्या. हे प्लास्टर आॅफ पॅरिस सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे आहे. विशेष म्हणजे, हे प्लास्टर आॅफ पॅरिस पर्यावरणाला घातक आहे. यामुळे नागरिकांनी या मूर्तीच्या खरेदीवर बहिष्कार टाकला होता. परंतु मूर्तिकारांनी भोळ्या गणेशभक्तांनाच विघ्नात टाकले.व्यावसायिक मूर्तिकार गणरायाच्या मूर्ती काही तासापूर्वी लाल मातीच्या असल्याचे ठामपणे सांगत होते. त्याच मूर्ती उघड्यावर पडल्यावर फुटल्या. त्यात प्लास्टर आॅफ पॅरिसचाच चुरा निघाला. यामुळे मूर्तिकारांनी गणेशभक्तांना फसविल्याचे उघड झाले. (शहर वार्र्ताहर)