शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा

By admin | Updated: April 30, 2017 01:16 IST

समाजातील गोरगरिब, वंचितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी क्रांतिज्योती महिला संस्था गेल्या आठ वर्षांपासून धडपडत आहे.

मोफत शिक्षण : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी धडपडयवतमाळ : समाजातील गोरगरिब, वंचितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी क्रांतिज्योती महिला संस्था गेल्या आठ वर्षांपासून धडपडत आहे. आता येत्या शैक्षणिक सत्रापासून आपल्या निवासी शाळेत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी माहिती संस्थेच्या संचालिका कांचन वीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. क्रांतिज्योती महिला बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रातर्फे २००९ पासून दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी येथे आश्रमशाळा चालविली जाते. सामाजिक कार्यकर्त्या कांचन वीर यांनी पदरमोड करून ही शाळा चालविली आहे. शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. मात्र शिक्षणाशिवायही शेतकऱ्यांच्या मुलांच्या अनेक मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांच्याकरिता निवासी स्वरूपाची शाळा आवश्यक आहे. त्यामुळेच आता आपल्या संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण व निवासाची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे कांचन वीर यांनी सांगितले. नेर येथील तंबाखे नगरात ही शाळा सुरू होत आहे. शाळेच्या जागेसाठी कांचन वीर यांना स्वत:ची पाच एकर शेती विकावी लागली. शासनाचे कोणतेही अनुदान न घेता ही समाजसेवा आपण करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील गरजू आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांची यादी तहसील प्रशासनाकडून आपण घेणार असून, त्यांना शाळेत प्रवेश देणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या उपक्रमासाठी दानशुरांनी मदत देण्याचे आवाहनही त्यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)