शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अनलाॅकमध्येही शाळा राहणार ‘लाॅक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागातून माहिती घेतली असता, नवीन सत्रात शाळा २८ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र केवळ शिक्षकांनाच शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार नाही. शिक्षक शाळेतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याचे काम करणार आहेत. यावरून शाळांमधील वर्गखोल्या बंद अन् स्टाफरूम मात्र सुरू असे चित्र नव्या सत्रात पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देगुरुजींना मात्र यावेच लागेल : विद्यार्थी-पालक संभ्रमात, शासन आदेशाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्या कोरोनाने गेल्या वर्षी शाळा कुलूपबंद केल्या होत्या, तो कोरोना आता थंडावला आहे. त्यामुळे नव्या सत्रासाठी शाळा उघडणार का, हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने कोरोना घटल्याचे कारण पुढे करीत संपूर्ण बाजारपेठ खुली केली, तरी शाळा उघडण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे अनलाॅकच्या आदेशानंतरही जिल्ह्यातील सव्वातीन हजार शाळा बंदच राहणार असल्याचे संकेत आहेत. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागातून माहिती घेतली असता, नवीन सत्रात शाळा २८ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र केवळ शिक्षकांनाच शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार नाही. शिक्षक शाळेतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याचे काम करणार आहेत. यावरून शाळांमधील वर्गखोल्या बंद अन् स्टाफरूम मात्र सुरू असे चित्र नव्या सत्रात पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या ३३५३ शाळा आहे. त्यापैकी २१०९ जिल्हा परिषद, १४८ शासकीय, ७०२ अनुदानित तर ३९४ विनाअनुदानित आहेत. प्रत्यक्षात विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार आहे. तेथेही केवळ शिक्षकांना शाळेत बोलावण्यात आले आहे. यवतमाळसह विदर्भात दरवर्षीप्रमाणे २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. मात्र २६ व २७ रोजी शासकीय सुटी असल्याने २८ जूनपासून सत्र सुरू होत आहे. कोरोना कमी झालेला असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे तूर्त विद्यार्थ्यांना शाळेत न बोलाविता केवळ शिक्षकांना बोलाविले जाणार आहे. 

शिक्षणाधिकारी म्हणतात, प्लॅनिंग सुरू आहेमहाराष्ट्रात ज्याप्रमाणे शाळा सुरू झाल्या, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही होतील. शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. मात्र सध्या विद्यार्थ्यांना न बोलाविता त्यांना ऑनलाइन शिकविले जाईल. एससीआरटीमार्फत सेतू वर्ग सुरू होतील. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती पाहून ग्रामीण भागासाठी आणखी प्लॅनिंग करता येईल. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ

शाळा सुरू करायची म्हटली तर..

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंदच आहेत. त्या आता सुरू करायच्या म्हटल्या तर वर्गखोल्यांच्या साफसफाईसह अनेक कामे करावी लागतील. याबाबत शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी म्हणाले, शाळांच्या मागणीप्रमाणे मान्सनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी १० लाखांचा निधी ठेवलेला आहे. ज्या शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या, त्यांची ग्रामपंचायतीमार्फत सफाई, निर्जंतुकीकरण केले जाईल. शाळा स्तरावर पटसंख्येनुसार १० टक्के निधी असतो, त्यातूनही शाळेच्या स्वच्छतेची कामे करता येतील.

सर्वच गुरुजींची शाळा सुरू होणार...?- जिल्ह्यात सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण विभागाकडून शाळांना नवीन शैक्षणिक वर्षाबाबत तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत तर ऑनलाइन अभ्यासक्रम उपक्रम राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या