शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

सभापतींच्या दालनात भरली शाळा

By admin | Updated: August 3, 2016 01:31 IST

दारूच्या नशेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिंदोला (माईन्स) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत ..

मद्यपी शिक्षकाविरूद्ध रोष : शिंदोला येथील पालकांचा पंचायत समितीत ठिय्या वणी : दारूच्या नशेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिंदोला (माईन्स) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत एका विक्षिप्त शिक्षकाच्या विरोधात पालकांनी मंगळवारी विद्यार्थ्यांसह येथील पंचायत समितीवर धडक दिली. जोपर्यंत सदर मद्यपी शिक्षकाची बदली करून त्या ठिकाणी महिला शिक्षिका देण्यात येणार नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत पालकांच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने विद्यार्थी पंचायती समितीचे सभापती सुधाकर गोरे यांच्या दालनात ठिय्या देऊन होते. पुरूषोत्तम देवतळे असे मद्यपी शिक्षकाचे नाव आहे. शिंदोला (माईन्स) येथे वर्ग एक ते सातवीपर्यंत शाळा असून या शाळेत गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत चार शिक्षकांची गरज असताना वर्तमान स्थितीत पुरूषोत्तम देवतळेसह तिनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यात देवतळे हे सकाळपासूनच मद्याच्या नशेत तर्र राहत असल्याने उर्वरित दोनच शिक्षकांना अध्यापनाचे कार्य करावे लागत आहे. त्याच्या परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. मागील एक वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांकडून शिक्षक देवतळेच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. मात्र अद्यापही शिक्षकाच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात आली नाही. कारवाई होत नसल्याने देवतळेची मग्रुरी वाढली असून बदली झाल्यास गावातील महिलांना खोट्या तक्रारीत अडकविण्याच्या धमक्या देवतळेच्या कुटुंबाकडून मिळत असल्याचे पालक व शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेकदा तक्रारी करूनही शिक्षक पुरूषोत्तम देवतळेची बदली होत नसल्याने संतप्त पालक आपल्या पाल्यांसह मंगळवारी सायंकाळी वणी पंचायत समितीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत शिंदोलाचे सरपंच तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शाळा समितीचे अध्यक्ष सिनू गुरंबार, कांचन हंसकर होते. यावेळी पालकांनी पंचायत समितीचे सभापती सुधाकर गोरे यांच्या समवेत चर्चा केली. त्यावर गोरे यांनी पुरूषोत्तम देवतळे याची बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी तातडीने नवीन शिक्षक पाठविण्याची कारवाई करण्यात आल्याचे पालकांना सांगितले. मात्र शाळेत मुलींची संख्या अधिक असल्याने महिला शिक्षिकेसह आणखी एक शिक्षक द्या, अशी मागणी पालकांनी केली. सायंकाळी उशिरापर्यंत या मागणीवर तोडगा निघाला नव्हता. अनेकदा तक्रारी करूनही शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षक देवतळेला पाठिशी घालत असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला. दरम्यान, सभापती गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दालनात बोलावून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. (कार्यालय प्रतिनिधी) नृत्यशौैकीन शिक्षक मद्यपी शिक्षक पुरूषोत्तम देवतळे याच्या विक्षिप्त वर्तनाचा पाढाच विद्यार्थीनींनी सभापती सुधाकर गोरे यांच्यापुढे वाचला. खाली बसण्याच्या तरटपट्टया साडीसारख्या नेसायला लावून गुरूजी आम्हाला वर्गातच नृत्य करायला लावतात. अश्लिल आणि घाणेरड्या शब्दात आमच्याशी बोलतात, अशी माहिती विद्यार्थींनीनी गोरे यांना यावेळी दिली.