शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पतसंस्था पुन्हा ‘सहकार’कडे

By admin | Updated: July 21, 2015 01:56 IST

शालेय कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या

हॅट्रिक : सर्व १५ ही जागा जिंकल्या, जिल्ह्यातील मोठी संस्थायवतमाळ : शालेय कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १५ ही जागा सहकार पॅनलने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. दहा वर्षांपासून या पतसंस्थेत सत्ताधारी असलेल्या सहकार पॅनलने या निवडणुकीतील विजयाने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. या पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी रविवारी निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात आला. सत्ताधारी सहकार पॅनलविरुद्ध शिक्षक आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनल असा सामना झाला. सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांचे १३ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आल्याने पतसंस्थेची निवडणूक चर्चेत आली होती. परंतु जिल्हा उपनिबंधकांनी हे सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविले. त्याचप्रमाणे जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने निवडणूक रविवारी झाली. सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये निरज भानुदास डफळे (१४५२), गणेश विठोबाजी म्हातारमारे (१३९९), शंकर श्यामरावजी भगत (१४०६), अशोक आनंदराव पोले (१४१६), राजेश केशवराव पुरी (१३९५), कोमलचंद सुगनचंद नाहार (१२९१), प्रमोद महादेवराव भेंडे (१३७३), विठ्ठल भगवंतराव परांडे (१३०५), संजय गुलाब भोयर (१३९४), भारत लटारी गारघाटे (१३९९), श्रीकांत मधुकर बोरकर (१५५९), गुलाब देवराव चव्हाण (१५१५), ज्ञानेश्वर भाऊरावजी गायकवाड (१४७७), मोहिनी सुधीरराव बक्षी (१४८१) आणि शुभांगी सुनील चोपने (१४४४) यांचा समावेश आहे. उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)राजेश पुरींचा चौथा विजयपतसंस्थेच्या सचिवपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे राजेश पुरी यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला आहे. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर याहीवेळी मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. उमरखेड मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली. आमदार समर्थित पॅनलचा दारूण पराभवसंपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असलेली ही पतसंस्था ताब्यात मिळविण्यासाठी परिवर्तन पॅनलनेही सर्व शक्ती पणाला लावली होती. हे पॅनल अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे समर्थित शिक्षक आघाडी पुरस्कृत होते. या पॅनलने सहकारच्या उणीवा दाखवित, सत्ताधाऱ्यांची उणीदुणी काढत विविध आरोप केले. मात्र त्यांना यात यश आले नाही. दारूण पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. विशेष म्हणजे, या पॅनलमधील एका उमेदवाराला पराभवाच्या हॅट्ट्रिकला तोंड द्यावे लागले. या पॅनलचा पराभव म्हणजे शिक्षक आघाडीला चांगलीच चपराक मानली जात आहे. सहकार पॅनलने नियोजनबद्ध केलेला प्रचार त्यांच्या विजयाचे गुपित मानले जाते.