शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जिल्ह्यातील शाळा समित्या राज्याला पथदर्शक

By admin | Updated: September 15, 2015 05:08 IST

शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळांमध्ये अपेक्षित सुसंवाद नसल्याने अनेक शालेय योजना ढेपाळतात. मात्र,

यवतमाळ : शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळांमध्ये अपेक्षित सुसंवाद नसल्याने अनेक शालेय योजना ढेपाळतात. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शाळा व्यवस्थापन समित्यांनी उत्तम कामगिरी केली असून त्यांचे हे कार्य आता महाराष्ट्रभरातील शाळांना मार्गदर्शक ठरणार आहे. जिल्ह्यातील चार गावांतील शाळा समित्यांच्या माहिती पुस्तिेकत समावेश करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे एक माहिती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. ज्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी शाळांसाठी चांगले उपक्रम राबविले, त्यांची माहिती या पुस्तिकेत एकत्रित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी (उमरखेड), जनुना (उमरखेड), कोठारी (महागाव), कृष्णापूर (यवतमाळ) या गावांतील शाळा व्यवस्थापन समितीच्या कामांचा त्यांत समावेश करण्यात येणार आहे. येत्या काळात जिल्ह्यातील या गावांचे काम महाराष्ट्रभरातील शाळा व्यवस्थापन समित्यांसाठी पथदर्शक ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढावी, यासाठी ढाणकी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी स्वत:च्या ट्रॅक्टरवर जाहिराती लावून मिरवणुका काढली होती. कृष्णापूरच्या व्यवस्थापन समितीने मातांचा मेळावा घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आईचे मोल स्पष्ट केले. जनुनाच्या शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत सस्नेह भोजनाचा उपक्रम सरू केला. कोठारीच्या सदस्यांनी स्वत: वर्गात पेंटिंग्स काढून विद्यार्थ्यांच्या मनावर ज्ञानरचनावाद बिंबवण्याचा प्रयत्न केला. काही गावांतील समिती सदस्यांनी चक्क शिक्षक रजेवर असताना अध्यापनाचे कामही बजावले. तर काही ठिकाणच्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळेत कॉन्व्हेंट सुरू करून दाखविले आहे. अशी कामे महाराष्ट्रभरातील समित्यांनीही करून दाखवावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रयत्न चालविले आहे. त्याच हेतूने मंगळवारपासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुणे येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांसाठी मार्गदर्शक पुस्तिकेसह इतरही माहितीपर साहित्य या दोन दिवसीय प्रशिक्षणात तयार करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ढाणकीचे शिक्षक करणार प्रेझेंटेशन४यवतमाळ जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन समित्यांची माहिती महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी ढाणकी (उमरखेड) येथील शिक्षक शफी अजीस शेख यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निवड केली आहे. विशेष म्हणजे संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाच समावेश असलेल्या या प्रशिक्षणात केवळ ७ शिक्षकांचा समावेश आहे. त्यात संपूर्ण विदर्भातून शफी अजीस शेख हे एकमेव आहे. जिल्ह्यातील समित्यांच्या कामांबाबत ते या प्रशिक्षणात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करणार आहेत.