शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृतीचे खाते गोठविले

By admin | Updated: July 12, 2014 23:54 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होवू नये यासाठी,

राष्ट्रीयीकृत बँकांची हेकेखोरी : जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न रुपेश उत्तरवार - यवतमाळप्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यात २३ हजारांवर आहे. शिष्यवृत्ती वाटपात गैरप्रकार होवू नये यासाठी, रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश होते. यानुसार विद्यार्थ्यांनी झिरोे बॅलेंसवर काढलेले खाते राष्ट्रीयीकृत बँकांनी गोठविले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अडचणीत सापडला आहे.शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य शासनाने शिष्यवृत्ती जाहीर केली. यामध्ये प्रत्येक घटकांचा विचार करण्यात आला. शिष्यवृत्तीचे वाटप करताना कुठेही गैरप्रकार होऊ नये आणि व्यवस्थापनाकडून त्याचा केला जाऊ नये म्हणून थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विद्यार्थ्यांना बँक खाते काढण्याच्या सूचना महाविद्यालयांनी केल्या.विद्यार्थ्यांचे खाते झिरो बॅलेंसवर काढण्याच्या सूचना होेत्या. यासाठी प्रारंभी राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दिला. पाठपुराव्यानंतर बँका यासाठी तयार झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला. आता मात्र स्टेट बँकेने ही खाती गोठविली आहे. सहा महिन्यांपासून कुठलाच व्यवहार नसल्याचे कारण पुढे करीत खाते बंद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला. हा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पाठविण्यात आला असता बँकेत विद्यार्थ्यांचे खातेच नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे शिष्यवृत्ती द्यायची कशी हा गंभीर प्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे. विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दोन कोटी ३० लाखांपेक्षा अधिक रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र राष्ट्रीयीकृत बँकेच्या अफलातून निर्णयाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, बँकांच्या या आडमुठ्या धोरणाविरुद्ध आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा मुख्याध्यापक कृती समिती अध्यक्ष विजय खरोडे यांनी दिला आहे.