शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मध्ये औषधांचा तुटवडा

By admin | Updated: June 9, 2017 01:40 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक महत्त्वाची व जीवनावश्यक औषधे उपलब्ध होत नाही.

रूग्णांची परवड : स्थानिक खरेदी वशिलेबाजांसाठी, अ‍ॅट्राफिन इंजेक्शनच नाहीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक महत्त्वाची व जीवनावश्यक औषधे उपलब्ध होत नाही. पुरवठादारांकडून औषधी येत नसल्याची सबब पुढे करून रूग्णालय प्रशासनाने हात वर केले आहे. गरीब रूग्णांसाठी अधिष्ठातांच्या परवानगीने औषधी खरेदी करण्याची तरतूद आहे. मात्र याचा लाभ केवळ वशिला घेऊन आलेल्या रुग्णांनाच मिळतो. गरीब रूग्ण पदरमोड करून औषधांची बाहेरून खरेदी करीत आहे. ग्रामीण भागातील रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येतात. येथे अनेक औषधांची कायम टंचाई असते. अकस्मात डॉक्टरांकडून औषधी बाहेरून आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे रूग्णालय परिसरातील मेडिकल स्टोअर्समध्ये अक्षरश: रांगा असतात. शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात शासकीय रूग्णालयाच्या औषधी पुरवठ्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाते. तसेच गरीब रूग्णांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून अधिष्ठातांच्या परवानगीने स्थानिक पातळीवर तत्काळ औषधी खरेदी करून रूग्णांना देण्याची तरतूद आहे. मात्र या प्रक्रियेत केवळ वशिला असलेल्या रूग्णालाच लाभ मिळत असल्याची ओरड सुरू आहे.सामान्य रूग्णाला पदरमोड करून औषधांची खरेदी करावी लागते. फेब्रुवारी महिन्यापासून शासकीय रूग्णालयात ‘अ‍ॅट्रोफीन’ इंजेक्शनचा तुटवडा आहे. विष प्राशन केलेल्या व पोटदुखीने आजारी रूग्णांना हे इंजेक्शन देणे आवश्यक आहे. मात्र तुटवडा असल्याने ते बाहेरून खरेदी करून आणावे लागत आहे. त्याचा नाहक भुर्दंड गरीब रूग्णांना सोसावा लागत आहे. इतरही अनेक महत्त्वाची औषधी रूग्णालयात उपलब्ध नाही. बाह्यरूग्ण तपासणी विभाग व आंतररूग्ण विभागात डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी निम्मे औषध बाहेरून आणावे लागते. यामुळे शासकीय रूग्णालयातील औषधी पुरवठा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विष प्राशनाचे रूग्ण वाऱ्यावरयवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. सातत्याने शासकीय रूग्णालयात विष प्राशन केलेल्या रूग्णांसह शेतकरीही मोठ्या प्रमाणात येतात. अशा स्थितीतही त्यासाठी रामबाण असणाऱ्या अ‍ॅट्रोपिन इंजेक्शनचा पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.