शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

शासकीय रक्तपेढीत तपासणी कीटचा तुटवडा

By admin | Updated: September 21, 2015 02:32 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समस्यांचे माहेरघर बनले आहे.

रूग्णांची परवड : खासगी पेढीतून घ्यावे लागते रक्त यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. येथील कोणत्याच विभागाचे काम सुरळीतपणे सुरू नाही. अनेक अडचणींचा सामना येथील यंत्रणेला करावा लागत आहे. रक्तपेढीत तपासणीसाठी लागणारी एलायझर कीट नसल्याने रक्त पिशव्याच मिळणे बंद झाले आहेत. अनेक रुग्णांना खासगीतून रक्ताची व्यवस्था करावी लागत आहे. पुरवठादाराने किटी दिल्या नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. रक्तदात्याने रक्तपेढीत रक्त जमा केल्यानंतर त्या रक्ताच्या विविध प्रकारच्या पाच तपासण्या केल्या जातात. यासाठी ‘एलायझर’ किटचा वापर केला जातो. मात्र १२ सप्टेंबरपासून येथील किट संपल्याने रक्त तपासणीचे कामच खोळंबले आहे. पेढीत तब्बल २० रक्त पिशव्या चाचणीअभावी पडून आहेत. यातच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जवळपास शंभरावर रक्तपिशव्या गोळा झाल्या आहेत. या पिशव्याचीही चाचणी झालेली नाही. रक्त पिशवीवर चोवीस तासाच्या आत तपसणी करणे आवश्यक असते. त्यानंतर या रक्ताचा उपयोग होत नाही. नाईलाजाने रक्त पिशव्या स्टोअरमध्ये ठेवाव्या लागल्या. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रशासनाचा डोलारा पूर्णत: कोसळला आहे. अधिष्ठाताचे नियंत्रण नसल्याने अनेक समस्या येथे सातत्याने उद्भवत आहेत. पुरवठादारांकडून नियमित पुरवठा केला जात नाही. अनेक अत्यावश्यक औषधी येथे उपलब्ध होत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)