शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार

By admin | Updated: June 25, 2017 00:14 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार

कर्जमाफी : दोन लाख ३३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तर एक लाख ३० हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार शेतकऱ्यांकडे १ हजार ३५० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. यामध्ये सर्वाधिक एक लाख ४० हजार थकबाकीदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. त्यांच्याकडे एक हजार ७० कोटीचे कर्ज थकले आहे. ४९ हजार २६५ शेतकऱ्यांकडे दीड लाखापर्यंतचे ३४६ कोटी ८५ लाख रूपयांचे कर्ज थकले आहे. तर एक लाख ३० हजार शेतकऱ्यांकडे दीड ते दोन लाखांचे कर्ज थकले आहे. ही थकबाकी ९३८ कोटींच्या घरात आहे. दीड लाखापेक्षा अधिक रकमेची परतफेड केल्यानंतर या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकेच्या ८६ हजार सभासदाकडे ४५० कोटी रूपये थकले आहे. याची अद्ययावत माहिती बँकेला प्राप्त व्हायची आहे. यामुळे इतर बँकेच्या ८६ सभासदांना याचा लाभ होणार आहे. शासकीय कर्मचारी वगळले शेती व्यवसाय करणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे. तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही शेतकरी म्हणून कर्जमाफीच्या लाभातून वगळण्यात आलेले आहे. लोकप्रतिनिधीच जबाबदार राष्ट्रीयकृत बँकांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांना केवळ ९ टक्केच कर्जवाटप केले आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. अशाही स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांची पेरणी आता उलटण्याच्या मार्गावर असल्याने ते पुन्हा संकटात सापडले. राष्ट्रीयकृत बँकांच्या या निर्माण झालेल्या परिस्थितीला खुद्द लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. मंगळवार, २७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकर्स कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना आपण आडव्या हाताने घेणार असल्याचेही तिवारी यांनी सांगितले. राष्ट्रीयीकृत बँकांच्या नऊ टक्के कर्जाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे यवतमाळ : खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ नऊ टक्के पीककर्ज वाटप केल्याचे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचविण्यात आले आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकांना जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार २३४ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट शासनाने निश्चित करून दिले होते. परंतु जून संपायला आला तरी या बँकांचे पीककर्ज वाटप आतापर्यंत केवळ ११ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले आहे. त्याची टक्केवारी अवघी नऊ (१०६ कोटी) एवढी आहे. ‘लोकमत’ने शनिवारी राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपाच्या या गतीचा पर्दाफाश केला. त्याची दखल घेत किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’चे हे वृत्त थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पाठविले. कर्ज वाटपाची गती अशीच कायम राहिल्यास हजारो एकर जमीन पडिक राहण्याची भीतीही व्यक्त केली गेली आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटपाची गती (४८ टक्के) समाधानकारक मानली जाते. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात एक पैसाही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. एवढेच काय, बी-बियाण्यांसाठी दिल्या जाणाऱ्या दहा हजाराच्या अग्रीमचाही पत्ता नाही. दरवर्षी हजारो शेतकरी आपल्या घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतात. परंतु शासनाने यावर्षी कर्जमाफीची घोषणा केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही हात आखुडता घेतला आहे. पर्यायाने बँकांची थकीत कर्जाची वसुली होवू शकली नाही. त्यामुळे आता बँकांकडे कर्ज वाटपासाठी पैशांची सोय नाही.