शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सॉ मिलला भीषण आग

By admin | Updated: November 4, 2014 22:46 IST

येथील नेहरूनगरातील सॉ मिलला पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात ट्रक, दुचाकी यासह सुमारे ७० लाख रुपयांचा प्लायवूड आदी साहित्य भस्मसात झाले. तब्बल नऊ तास धुमसत

नऊ तास तांडव : ट्रक, दुचाकींसह ७० लाखांचे प्लायवूड खाकयवतमाळ : येथील नेहरूनगरातील सॉ मिलला पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात ट्रक, दुचाकी यासह सुमारे ७० लाख रुपयांचा प्लायवूड आदी साहित्य भस्मसात झाले. तब्बल नऊ तास धुमसत असलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ४० बंब कामी आले. पुलगाव येथील सैन्यदलाच्या बंबालाही पाचरण करण्यात आले होते. आगीच्या या रौद्ररूपाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सदर आग शॉट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यवतमाळ शहरातील नेहरूनगर परिसरात देवीप्रकाश अग्रवाल (रा. राजेंद्र नगर) यांची भगवती सॉ मिल आहे. विस्तीर्ण अशा सॉ-मिलमध्ये शेकडो टन लाकूड, प्लायवुड आणि इतर साहित्य ठेवून होते. मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. पहाटेची वेळ असल्याने आग तात्काळ लक्षात आली नाही. मात्र या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. धुराचे लोटच्या लोट निघत होते. या आगीची माहिती तात्काळ यवतमाळच्या अग्नीशमन दलाला देण्यात आली. चार बंब तात्काळ दाखल झाले. तसेच आगीची तीव्रता पाहून पुलगाव येथील सैन्यदलाच्या बंबालाही पाचारण करण्यात आले. ४० बंब आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. त्यानंतर तब्बल नऊ तासाने आगीवर नियंत्रण मिळविता आले. मात्र धुराचे लोट निघतच होते. या आगीत प्लायवूड, अ‍ॅल्युमिनीअम आणि स्टील फ्रेम या सोबतच ट्रक, दोन दुचाकी तसेच लाकूड भस्मसात झाला. आगीची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या सॉ मिललाच लागून वसाहत आहे. आगीमुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी आपल्या घरातील ज्वलनशील पदार्थ आणि स्वयंपाकाचे गॅस सुरक्षी तस्थळी हलवीले होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्याने या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे कळू शकले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉट सर्किटने आग लागल्याचे सांगितल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)