शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तूर विक्रीसाठी ससेहोलपट

By admin | Updated: March 3, 2017 02:01 IST

तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. यावर्षी जादा क्षेत्रात लागवड झाल्याने तुरीचे उत्पादन तब्बल

केंद्र बंद : यंदा १० लाख क्विंटलची वाढ होण्याची अपेक्षा यवतमाळ : तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. यावर्षी जादा क्षेत्रात लागवड झाल्याने तुरीचे उत्पादन तब्बल १० लाख क्विंटलने वाढण्याचे संकेत आहे. नेमकी हीच बाब हेरून व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तुरीचे भाव पाडले आहे.यावर्षी तब्बल ६८ हजार हेक्टवर तुरीचा जादा पेरा झाला. मागीलवर्षी जिल्ह्यात एक लाख १९ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. यावर्षी ६८ हजार हेक्टरने हे क्षेत्र वाढून एक लाख ८७ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला. वाढीव लागवडीमुळे यावर्षी उत्पन्नातही तब्बल १० लाख क्विंटलची वाढ होण्याचे संकेत आहे. मागीलवर्षी केवळ पाच लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले होते. ते यावर्षी १५ लाख क्विंटल होण्याची अपेक्षा आहे. तुरीचे उत्पादन वाढण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शासनाने हमी दरात तूर खरेदीसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले. खुल्या बाजारात केवळ ३२०० ते ३५०० रूपये प्रती क्विंटलचे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे धाव घेतली. त्यामुळे तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. आता काही केंद्रांत बारदाना उपलब्ध नसल्याने सध्या बाभूळगाव, कळंब, आर्णी, राळेगाव आणि घाटंजी येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)बारदाणा, जागा नसल्याने खरेदी थांबलीअनेक केंद्रांवर सध्या बारदाना उपलब्ध नाही. काही ठिकाणी तूर साठविण्यासाठी गोदामात जागा नाही. त्यामुळे तूर खरेदी थांबली आहे. तथापि येत्या दोन दिवसांत सर्व केंद्रांवर बारदाना उपलब्ध होईल, अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच तूर ठेवण्यासाठी अतिरिक्त गोदामांना मंजुरी मागण्यात आली असून या गोदामांत ४० हजार क्विंटल तूर साठवून ठेवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यातील शेतकरी अद्याप भीतीच्या सावटात वावरत आहे.