शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा जंगलात सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:23 IST

मारेगाव तालुक्यात येणाºया वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीवर वनविभागाकडून केल्या जाणाºया खड्डयांना विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकºयांनी जंगलात सत्याग्रह सुरू आहे.

ठळक मुद्देकिसान सभेचे आंदोलन : वृक्षारोपणासाठी खोदण्यात येणाºया खड्ड्यांना विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मारेगाव तालुक्यात येणाºया वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीवर वनविभागाकडून केल्या जाणाºया खड्डयांना विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकºयांनी जंगलात सत्याग्रह सुरू आहे. खड्डयांसाठी वनविभागाकडून जोर जबरदस्ती केली जात असल्याने वनविभाग व शेतकरी आमने-सामने आले आहेत. मागील १५ दिवसांपासून हा संघर्ष सुरू असला तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिंद्रा येथील आदिवासी व पारंपरिक जमाती वनोजा शिवाराअंतर्गत येत असलेल्या जंगलात शेती करून गुजरान करीत आहेत. वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे, यासाठी सन २००६ साली वनाधिकार कायदा तयार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत, तर न्याय मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी पांढरकवडा जिल्हा सत्र न्यायालयातसुद्धा केसेस दाखल केलेल्या आहेत. एवढे कायदे व कायद्यानुरूप दावा दाखल केला असतानाही कायद्याचा विरोधात जाऊन वनविभाग खड्डे खणत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.वनविभागाच्या या मोहिमेला विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेचे कॉ.शंकरराव दानव यांच्या नेतृत्वात जंगलामध्ये गेल्या १५ दिवसांपासून शांततेत सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. मात्र वनविभागाने जबरीने कार्यवाही केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने शेतजमीन सोडून पडीत जमिनीवर वृक्षारोपन करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनात किसन मोहुर्ले, श्रीहरी लेनगुरे, सुधाकर सोनटक्के, सुनिता मोहुर्ले, अशोक लेनगुरे, प्रकाश मालेकर, राजहंस बुजाडे, संभा मडावी, तुळशिराम तुमराम, प्रभाकर बावणे, पंचफुला मडावी, लता मालेकर, ताराबाई तुमराम, रूखमाबाई मोहुर्ले, ताराबाई किनाके, शकुंतला लेनगुरे आदी सहभागी झाले आहेत.आंदोलनाबाबत वनविभाग अनभिज्ञगेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचा मछिंद्रा शेतशिवारात सत्याग्रह सुरू असताना वनविभाग मात्र या आंदोलनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील डोल, मछिंद्रा, हिवरा, वनोजा या गावांतील ३४ शेतकरी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात मारेगावचे आरएफओ जगन घुगे यांच्याशी संपर्क साधला असता, आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे यासंदर्भात मला काहीही माहित नसल्याचे ते म्हणाले.