आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल येथील डॉ. सारिका महेश शहा यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जळगाव येथे झालेल्या सोहळ्यात आमदार राजू भोळे यांनी शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. स्फूर्ती बहुद्देशीय संस्था जळगाव तर्फे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १६ महिलांचा गौरव करण्यात आला. यात डॉ. सारिका शहा यांचा समावेश आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. सारिका शहा यांचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
सारिका शहा यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:51 IST