शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संततधार

By admin | Updated: July 11, 2016 02:12 IST

गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार यवतमाळ : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून निम्न वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासून संततधार पावसाला प्रारंभ झाला. गत ४८ तासात पावसाने क्षणाचीही उसंत घेतली नाही. धो-धो बरसणाऱ्या या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी २५ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत मासिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महागाव तालुक्यात ४२ मिमी झाला असून यवतमाळ १३.२, बाभूळगाव ७, कळंब ६, आर्णी २०, दारव्हा ६, दिग्रस १६, नेर १३, पुसद ३७, उमरखेड ३२, केळापूर २७, राळेगाव ९, घाटंजी ४०, वणी ४१, मारेगाव २६, झरी ५१ मिमी पाऊस कोसळला. जिल्ह्यात आतापर्यंत ३५८ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. पैनगंगा, वर्धा यासह जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरत वाहत असून नाल्यांना आलेल्या पुरामुळे पुसद-उमरखेड मार्ग दहागावजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुराने ठप्प झाला होता. सायंकाळपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तर पुसद-महागाव हा रस्ता गुंज नाल्याला आलेल्या पुराने ठप्प झाला आहे. तसेच महागाव-करंजखेड येथे नाल्याच्या पुलावरही पाणी वाहत होते. पुसद तालुक्यातील बेलोरा खुर्द ते बेलोरा या मार्गावरील नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होते. पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष नजर ठेऊन आहे. तहसीलदार आणि गावातील संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्प तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. प्रकल्पात एक हजार २७३ फूट जलसाठा निर्माण झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो होण्यासाठी एक फूट पाण्याची आवश्यकता आहे. हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने यवतमाळकरांना दिलासा मिळणार असून आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा केला जाईल. लवकरच सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.