शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

पिकांना संजीवनी

By admin | Updated: September 18, 2015 02:22 IST

दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी रात्रीपासून धुव्वाधार पावसाला प्रारंभ झाला.

सोयाबीन तारले : कपाशीलाही फायदा यवतमाळ : दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर बुधवारी रात्रीपासून धुव्वाधार पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळपर्यंत पाऊस कोसळत होता. या पावसाने खरीप पिकांना संजीवनी दिली असून सोयाबीन तरले तर कपाशीला मोठा दिलासा मिळाला आहे. बाप्पांच्या आगमनासोबतच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर गणेश चतुर्थीला हास्य फुलले होते. मात्र पहाटेपासून कोसळणाऱ्या या पावसाने गणेशभक्तांची मात्र थोडी निराशा झाली. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील सर्व भागात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. उमरखेडपासून वणीपर्यंत सर्वत्र पावसाचा सारखाच जोर दिसत होता. गुरुवारी सकाळपासूनच पाऊस बरसत होता. कधी रिमझीम तर कधी जोरदार सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ११.७८ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ५८६.२५ मिमी पाऊस कोसळला आहे. केळापूर, वणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला. शेंगा पकडण्याच्या काळात पाऊस झाल्याने सोयाबीन पीक तरले आहे. पाऊस आणखी उशिरा आला असता तर सोयाबीन हातचे गेले असते. कपाशी, तूर या पिकांनाही संजीवनी मिळाली आहे. मात्र उडीद आणि मूग या पिकांना फटका बसला आहे. ऐन काढणीच्या काळात पाऊस कोसळला. (कार्यालय प्रतिनिधी) पारवा-पांढरकवडा मार्ग ठप्पबुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने घाटंजी तालुक्यातील पारवा ते पांढरकवडा मार्ग गुरुवारी सकाळी ठप्प झाला होता. झुली येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे सकाळी ७ वाजतापासून १० वाजेपर्यंत वाहतूक ठप्प होती. जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड या तालुक्यात गुरुवारी सकाळी ८ वाजतानंतर पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनला पावसाची सर्वाधिक गरज होती. शेंगेतील दाणा भरण्यासाठी या पावसाची आता मदत होणार आहे. जिल्ह्यात विक्रमी सोयाबीनचे पीक येण्याचा अंदाज आहे.