शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या वाहनांनी ग्रामीण रस्त्यांची ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ असे लेखी आदेश बांधकाम विभागाला दिल्याशिवाय रेतीघाटांचा लिलाव केला जाऊ नये, अशी मागणी डाॅ.राऊत यांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मोठ्या नद्यांवर असलेल्या रेतीघाटांच्या दिशेने जाणारे रस्ते खाचखळग्यांचे बनले आहे. रेती वाहतुकीच्या वाहनामुळे या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जवळपास ३० किलोमीटरचा मार्ग अतिशय कठीण झाला आहे. मार्गाची वहनक्षमता विचारात न घेता होत असलेल्या वाहतुकीमुळे या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. रेती वाहतुकीसाठी अनेक ठिकाणी घाट परिसरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात आहे. बहुतांश रस्ते ग्रामपंचायत क्षेत्रात येतात. या रस्त्यांची वहनक्षमता कमी असते. असे असतानाही तेथून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ राहते. हीच बाब या रस्त्याचे आयुष्यमान कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ असे लेखी आदेश बांधकाम विभागाला दिल्याशिवाय रेतीघाटांचा लिलाव केला जाऊ नये, अशी मागणी डाॅ.राऊत यांनी केली आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे सावळी सदोबा परिसरातील ७५ किलोमीटर रस्त्याची चाळण झाल्याची बाब दोन वर्षांपूर्वी डाॅ.राऊत यांनी प्रशासनाकडे मांडली होती. या प्रकरणात अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीसही दिल्या गेल्या. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता राॅयल्टीतून एक रुपयाही खर्च न केल्याची बाब डाॅ.राऊत यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या निदर्शनास आणून दिली. 

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीजिल्ह्यातील ३४ रेतीघाटांच्या लिलावाची जनसुनावणी बुधवार, १० नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील दक्ष नागरिकांनी आपल्या आक्षेप नोंदवावे, असे आवाहन डाॅ.प्रदीप राऊत यांनी केले आहे. करोडो रुपयांच्या सार्वजनिक मार्गाचे नुकसान करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, आजवर कुणालाही दंड न केल्याचे डाॅ.राऊत यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :sandवाळूroad transportरस्ते वाहतूक