शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात लॉकडाऊनमध्ये रेतीची तस्करी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

ज्या विभागाला रेती तस्करीवर नियंत्रण ठेवायचे आहे, तो महसूल विभाग कोरोनाचे निमित्त पुढे करून या रेती तस्करीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव न झाल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे. तालुक्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या पैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचे दुर्लक्ष । रेती साठविण्यासाठी तस्करांमध्ये लागली स्पर्धा, शेतशिवारात केले रेतीचे साठे

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील पैनगंगेच्या खोऱ्यातील उत्कृष्ट दर्जाच्या रेतीची तस्करांनी वारेमाप उपसा सुरू केला आहे. रोज शेकडो ट्रॅक्टर व ट्रकांद्वारे रेतीची अवैध वाहतूक होत आहे. हा सर्व प्रकार तालुक्यातील प्रशासनाला माहित असूनही ‘आपण सर्व भाऊ -भाऊ, रेतीचा पैसा वाटून खाऊ’ या स्वार्थातून रेती तस्करीचे सर्व कार्य सुरळीत सुरु आहे.ज्या विभागाला रेती तस्करीवर नियंत्रण ठेवायचे आहे, तो महसूल विभाग कोरोनाचे निमित्त पुढे करून या रेती तस्करीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव न झाल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे. तालुक्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या पैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे रेती तस्करांनी बंदी असूनही शेकडो ब्रास रेतीचा उपसा करुन नदी काठावरील शेतशिवारात, जंगलात व अन्य ठिकाणी साठा करून ठेवली आहे. याच डम्पिंग केलेल्या रेतीवर कधीकधीच महसूल प्रशासनाची नजर जाते. जप्त केलेल्या रेतीचीही त्याच कंत्राटदाराला विक्री करण्याचा अफलातून प्रकारही घडला आहे. तालुक्यातील रेतीघाट परिसर इको सेन्सेटीव झोन असून वाळू माफीया येथेच अधिक सक्रीय आहेत. याच भागातून मोठ्या प्रमाणात पांढरकवडासह अन्य तालुक्यातील रेतीचा पुरवठा होत असतो.याशिवाय छोट्या-मोठ्या नदी-नाल्यातून रेतीची तस्करी सुरू आहे. बंदी असतानाही रेतीची डम्पींग झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित करून यासाठी महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाविना हा प्रकार घडला कसा, असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी