यवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने निसर्गरम्य ढुमणापूर येथे आयोजित सहल उत्साहात पार पडली. यावेळी आयोजित विविध गेममध्ये सखींनी उत्साहात भाग घेतला. मारुतीचे जागृत देवस्थान आणि निसर्गरम्य असलेल्या या परिसरात सखींनी पिकनिकसोबतच सहभोजनाचा आनंद घेतला. सुरुवातीला हौजीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ‘राम-कृष्ण-विठ्ठल’ गेमचे आयोजन करण्यात आले. यात प्रथम क्रमांक स्मिता गंधे, द्वितीय क्रमांक माला टाके आणि तृतीय क्रमांक किरण मानधना यांनी पटकाविले, तर बॅलंसिंग गेममध्ये प्रथम क्रमांक पद्मा मुटकुळे, द्वितीय क्रमांक पुष्पा पारस्कर आणि तृतीय क्रमांक उषा खटे यांनी पटकाविला. दोन्ही गेम नीलिमा मंत्री, अलका राऊत, विद्या पोलादे यांनी खेळवले. या कार्यक्रमात १२ ते १२.१५ वाजेपर्यंत पोहोचलेल्या सखींमधून लकी लेडीची निवड करण्यात आली. यात सुरूची खरे लेकी लेडी ठरल्या. यावेळी विजेत्या सखींना लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. (उपक्रम प्रतिनिधी)
सखी मंचची पिकनिक उत्साहात
By admin | Updated: February 8, 2016 02:36 IST