मुलीने भेटही नाकरली : वडगाव रोड ठाणेदारांनी दिला धीर, साश्रूनयनाने गाठले गाव यवतमाळ : उच्च शिक्षणासाठी घराबाहेर आलेल्या मुलीने परस्परच आपला जीवनसाथी निवडला. एवढेच नव्हे तर तीने चक्क रीतसर नोंदणी विवाह केला. हा प्रकार आई-वडिलांना कळल्यावर त्यांनी वडगाव रोड ठाण्यात धाव घेतली. मात्र येथे त्यांच्या पोटच्याच मुलीने जन्मदात्यानांच भेट नाकारली. हे दृश्य पाहून प्रत्येक जण भावविविश झाले.वाशिम येथील भाग्यश्री आणि यवतमाळचा पवन (काल्पनिक नाव) या दोघांनी प्रेम विवाह केला. दोघांमध्ये जातीय आणि भाषिक भेद असल्याने भाग्यश्रीच्या कुटुंबियाचा या विवाहाला विरोध होता. तर पवनच्या कुटुंंबीयांनी भाग्यश्रीचा आनंदाने स्वीकार केला. इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मुलीने किमान एकदा तरी चर्चा करावी, यासाठी भाग्यश्रीचे भाऊ, बहीण, वडील, आई वडगाव रोेड ठाण्यात आले. मुलीच्या भेटीसाठी पोलिसांची गयावया करू लागले. मात्र भाग्यश्रीने चक्क जन्मदात्याशी बोलण्यास नकार दिला. पवनने दोघांच्याही वयाचे पुरावे, विवाह नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र पोलिसांच्या स्वाधीन केले. यावरून हा विवाह कायेदशीर असल्याने त्याचाही नाईलाज झाला. अगतिक मातेचा विलाप पाहुन ठाणेदार देविदास ढोले यांनी मुलीला कुटुंबीयांशी बोलण्याची विनंती केली. त्यानंतर ती तयार झाली. मात्र हा संवाद केवळ एकतर्फीच होता. तिने काही एक शब्द आपल्याला काढला नाही. यामुळे त्या माता पित्यांची अधिकच घालमेल झाली. हूमसून रडण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. मुलीची सनई चौघड्यात पाठवणी करण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या मातापित्यांना पोलीस ठाण्यातून साश्रृ नयनांनी परतावे लागले. यात कोण चुक, कोण बरोबर असे अनेक तर्कविकर्तक लावता येईल. पण अंगा खाद्यावर खेळवलेल्या मुलीची पाठवणी अशी कोणाच्याच वाट्याला येऊन नये, इतकी भावना व्यक्त करून ते कुटुंंब परत गेल. (कार्यालय प्रतिनिधी) अन् तिने एक शब्दही उच्चारला नाही पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून सदर तरुणीने आई-वडिलांशी बोलण्याची तयारी दर्शविली. मात्र जेव्हा आई पुढे आली तेव्हा त्या तरुणीच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. नाईलाजाने माता-पिता डोळ्यात अश्रू आणून पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले.
सैराट जोडप्यापुढे आई-वडील हतबल
By admin | Updated: September 2, 2016 02:27 IST