शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

सॅल्यूट केला नाही म्हणून महिला शिपायाची बदली

By admin | Updated: October 29, 2015 02:51 IST

शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यामध्ये पोलिसांची चांगलीच कसरत होत आहे.

साहेबांचा दुखावला इगो : वाढत्या गुन्हेगारीमुळे वरिष्ठही तणावातयवतमाळ : शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यामध्ये पोलिसांची चांगलीच कसरत होत आहे. याचा राग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून इतरत्र निघत असल्याचे दिसून येते. अशातच सॅल्यूट मारला नाही, या कारणारून एका महिला वाहतूक शिपायाची बदली तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे प्रकरण सध्या पोलीस वर्तुळात चर्चिले जात आहे. दुर्गादेवी, दसरा आणि आता दिवाळीचा बंदोबस्त, सोबत जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीही त्रस्त झाल्याचे दिसून येते. त्यातच मंगळवारी येथील एका चौकात दोन महिला वाहतूक पोलीस आपल्या कर्तव्यावर होत्या. यावेळी तेथून एक वरिष्ट पोलीस अधिकारी त्या चौकातून दोन वेळा गेले. दोन्ही वेळेला या महिला पोलिसांनी साहेबांना ‘सॅल्यूट’ ठोकला. परंतु तिसऱ्यांदा साहेबांचे वाहन आले तेव्हा या महिला वाहतूक शिपाई एका वाहनावर कारवाई करण्यात व्यस्त असल्याने त्यांचे साहेबांच्या गाडीकडे लक्षच नाही. या क्षुल्लक बाबींवरून साहेबांचा पारा मात्र चढला. कुठेतरी साहेबांचा ‘इगो’ दुखाविला गेला. लागलीच दोन्ही महिला शिपायांना बोलाविणे आले. साहेबांनी आपल्या कक्षात त्यांना चांगलेच सुनावले. मुकुटबनला बदली करावी लागते का, असा दमही दिला. या महिला शिपायांनी शक्य ती प्रामाणिक सफाई देण्याचा प्रयत्नही केला. परंतु कनिष्ट कर्मचाऱ्यांचे ऐकून घेतील, ते साहेब कसले. यापुढे लक्ष ठेवा, असे सांगून त्यांनी या महिला शिपायांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत दोघीही बाहेर पडल्या. सायंकाळी तडकाफडकी त्यातील एकीच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाल्याचे कळले. याबाबत अधिकृत सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. परंतु आॅर्डर अद्याप अप्राप्त असल्याचे सांगितले. या बाबींवरून वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांचाही ताण किती वाढला आहे आणि त्याच्यात कुणाचा बळी जाईल, हे सांगता येत नाही. याची मात्र खमंग चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)