शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सहस्त्रकुंड धबधब्याचा ‘कुंड’ तळाला

By admin | Updated: May 23, 2016 02:28 IST

जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचा कधीही न आटणारा कुंड यंदाच्या भीषण दुष्काळात तळाला गेला आहे.

भीषण टंचाईचे संकेत : १९७२ च्या दुष्काळासारखी पुन्हा यंदा स्थितीअविनाश खंदारे उमरखेड जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचा कधीही न आटणारा कुंड यंदाच्या भीषण दुष्काळात तळाला गेला आहे. त्यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकेत दिसत असून १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. या धबधब्याचे पाणी ज्या कुंडात कोसळते तो कुंड खोल असून त्यातील पाणी कधीच आटत नाही. परंतु यावर्षी निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाने या कुंडातील पाण्याची पातळी तळाला लागली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा धबधबा आता भकास झाला आहे. कुंडच आटत असल्याने परिसरातील भीषण पाणीटंचाईचे वास्तव लक्षात येते. १९७२ सालीही अशीच स्थिती निर्माण झाल्याचे जुने जाणते सांगत आहे. तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. नदी कितीही कोरडी पडली तरी कुंड मात्र कधीच आटत नाही. या कुंडातील पाणी मोटारपंप लावून अनेक जण उपसतात. त्यातून परिसरातील अनेक गावांची तहान भागते. परंतु आता पाणीटंचाई अशीच कायम राहिल्यास या परिसरावर नवे जलसंकट ओढवण्याची भीती आहे. कुंडाच्या तळाचा थांग नाहीपैनगंगा नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याच्या कुंडाची खोली किती आहे हे कुणालाही सांगता येत नाही. याबाबत परिसरात अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. या कुंडाची खोली मोजण्याचा प्रयत्न केला तेव्हा सात खाटांची दोरी एकत्र करून सोडली होती. परंतु तळाला दोर पुरला नव्हता, असे आजही परिसरातील वृद्ध जानकार सांगतात.