शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवड्याच्या कुख्यात सादिकला नागपुरातून अटक

By admin | Updated: April 13, 2017 01:00 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर चालकाचा खून करून ट्रकवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या

यवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर चालकाचा खून करून ट्रकवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या पांढरकवडा येथील कुख्यात गुंड शेख सादिक शेख गफ्फार (३५) याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली आहे. तो घटनेनंतर वर्षभरापासून पसार होता. यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात जमादार अजय डोळे, सैयद साजिद, वासू साठवणे, नीलेश राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांना सायबर सेलचे फौजदार जिंदमवार, शिपाई कविश पालेकर, पंकज गिरी यांची मदत लाभली. सुमारे वर्षभरापूर्वी पांढरकवडा महामार्गावर वडकी ठाण्याच्या हद्दीत तामिलनाडूकडून येणारा एक ट्रक लुटण्याचा बेत कुख्यात शेख सादिक टोळीने आखला होता. त्यांनी ट्रक अडविला व चालकाचा खून केला. त्यानंतर हा ट्रक पळवून नेत असतानाच पांढरकवड्याचे एसडीपीओ साहेबराव जाधव यांचे पथक तेथे पोहोचले. या पथकातील शिपायाने सादिकला ओळखले. मात्र तो पसार झाला. त्याच्या साथीदारांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून सादिक पोलिसांना गुंगारा देत होता. सादिक टोळीवर मोक्काही लावण्यात आला आहे. अखेर सादिक नागपुरात आश्रयाला असल्याची टीप मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सैयद साजिद यांच्या पथकाने त्याला अटक केली.