शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंच्या सरबत्तीने वळली बोबडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:05 IST

फवारणीमुळे विषबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोणबेहळच्या ग्रामस्थांना विचारलेल्या प्रश्नांवरून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांची बोबडी वळली.

ठळक मुद्देलोणबेहळ येथे गावकºयांशी संवाद : कृषी सहायक गावात येतो काय ?

राजू राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कलोणबेहळ : फवारणीमुळे विषबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोणबेहळच्या ग्रामस्थांना विचारलेल्या प्रश्नांवरून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांची बोबडी वळली. कृषी सहायकाला ओळखता काय, तो नियमित गावात येतो काय, असे प्रश्न विचारून त्यांनी कर्मचाºयांची पंचाईत केली. सारवासारव करण्याचा अधिकाºयांचा प्रयत्नही गावकºयांनी हाणून पाडला.सदाभाऊ खोत यांचा ताफा दुपारी लोणबेहळमध्ये धडकला. येथील फाट्यावर एका कॉप्लेक्समध्ये त्यांनी थोडावेळ ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यात ग्रामस्थांनी लोडशेडींग, रस्ते, आॅनलाईन आदी समस्या मांडल्या. नंतर त्यांचा ताफा शेंदुरसनीकडे वळला. तेथे फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या दीपक शामराव मडावी यांच्या घरी त्यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांच्या शेताची पाहणी केली. नंतर पुन्हा त्यांचा ताफा परत थेट लोणबेहळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकला. तेथे त्यांनी विषबाधेने कुणी दाखल आहे का, याची पाहणी केली. नंतर ते येथील ग्रामपंचायतीत पोहोचले.ग्रामपांयतीत त्यांनी छोटेखानी बैठक घेतली. यावेळी पूर्ण यंत्रणा उपस्थित होती. खोत यांनी उपस्थितांना तुम्ही कृषी सहायकाला ओळखता का, असा थेट प्रश्न केला. त्यावर एकाने ‘हो’ असे उत्तर दिले. मात्र ते खोत यांना रूचलेही नाही अन् पचलेही नाही, हे त्यांच्या चेहºयावरून स्पष्टपणे जाणवत होते. त्याचवेळी त्यांनी तेथून गावातील रंजनाबाई भगत यांच्या घरी शौचालयाचे भूमिपूजन करण्यासाठी प्रस्थान केले. रस्त्याने जाताना-येताना त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यावेळी मात्र त्यांना खरे उत्तर मिळाले. ग्रामस्थांनी त्यांना चक्क कृषी सहायकाला ओखळत नाही म्हणून सांगून टाकले. त्यांना कधी पाहिले नाही, त्यांचे नावही माहिती नाही, ते कधी येतही नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.कृषी सहायक गावात येतच नसल्याचे कळताच खोत यांनी तलाठ्याबाबत विचारपूस केली. त्यांच्याबद्दलही ग्रामस्थांनी तीच माहिती दिली. नंतर ग्रामसेवकाला याची रजिस्टरमध्ये नोंद घेता का, अशी विचारणा केली. ग्रामसेवकाने असे कोणतेच रजिस्टर नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे खोत यांचा पारा भडकला. त्यांनी अखेर तालुका कृषी अधिकाºयांना रोजनिशी दाखविण्याचे निर्देश दिले. मात्र कृषी अधिकाºयाजवळ रोजनिशीच नव्हती. ती घरी विसरल्याचे त्यांनी ठोकून दिले. यावरून सर्व प्रकार खोत यांच्या लक्षात आला. त्यांनी तहसीलदारांना या सर्व प्रकाराबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल ग्रामविकास विभागाला पाठविला जाणार असून कृषी विभागाशी संबंधित कर्मचाºयांवर थेट कृषी राज्यमंत्री खोत कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली.ग्रामपंचायतीत रजिस्टर ठेवायापुढे ग्रामपंचायतीत रजिस्टर ठेवून त्यात गावात येणाºया कर्मचाºयांच्या नोंदी ठेवा, असे निर्देश कृषी राज्यमंत्री खोत यांनी दिले. कृषी सहायक, तलाठी यांच्या भेटीचे दिवस निश्चित करा. ते त्यानुसार येतात का, याची नोंद ठेवा, असेही त्यांनी बजावले. खोत यांच्या आगळ्यावेगळ्या दौºयाने कर्मचाºयांमध्ये धडकी भरली आहे. त्यापैकी कुणावर कारवाईची कुºहाड कोसळते, याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.