शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘सबला व अमृत’ला आधार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:40 IST

आधार कार्ड नसल्यास सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ नाकारला जाणार आहे. याचा फटका गरीब आणि गरजू कुटुंबाला बसणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारी ही बाब आहे.

ठळक मुद्देसक्ती टाळा : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधार कार्ड नसल्यास सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ नाकारला जाणार आहे. याचा फटका गरीब आणि गरजू कुटुंबाला बसणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारी ही बाब आहे. सदर योजनेसाठी आधारची सक्ती केली जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी जिल्हा महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. क्रांती राऊत (धोटे) यांनी नेतृत्त्व केले.कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी गरीब गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी सबला आणि अमृत आहार योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. मात्र या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. जगविण्यापेक्षा ओळखपत्राला अधिक महत्त्व देण्याच्या या भूमिकेमुळे अनेक बालक आणि महिलांना या मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. विशेषत: बेघर, स्थलांतरित आणि रहिवासी पुरावा नसलेल्या कुटुंबांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. मुलभूत मानवी हक्काची पायमल्ली या सक्तीमुळे होत आहे. शिवाय पोषण आहाराचे सहा महिन्याची देयकेही महिला बचत गटांनी सरकारला दिलेली नाही. ही बाब गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कुपोषणाचा टक्का घटावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे. यावर विचार व्हावा असे म्हटले आहे. निवेदन देताना वनमाला अवथळे, नीलिमा राऊत, माधुरी कदम, नयंती वैद्य, अश्विनी टेकाम, नंदिनी अवथळे, लीना तराळे आदींची यावेळी उपस्थिती होती.