शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

मुक्या जनावरांची निर्दयपणे वाहतूक

By admin | Updated: September 6, 2015 02:25 IST

बोलेरो पीकअप या चारचाकी मोठ्या वाहनातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १६ बैलांची पायांना दोरीने बांधून निदर्यीपणे वाहतूक सुरू होती.

१६ बैल : तिघांविरूद्ध झाला गुन्हा दाखल, चार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्तपांढरकवडा : बोलेरो पीकअप या चारचाकी मोठ्या वाहनातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १६ बैलांची पायांना दोरीने बांधून निदर्यीपणे वाहतूक सुरू होती. शनिवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास केळापूर मार्गावरील टोल नाक्याजवळ हे वाहन पोहोचताच पोलिसांनी या जनावरांची निर्दयी वाहतूक करणाऱ्या तिघांच्या मुसक्या अखेर आवळल्या.पांढरकवडा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात जातो. कन्याकुमारी ते विशाखापट्टनम जाणारा हा मार्ग रात्रभर वाहनांनी गजबजून जातो. याच मार्गावरून रात्री अंधाराचा लाभ घेत काही जण अत्यंत निर्दयीपणे मुक्या जनावरांची वाहतूकही करतात. या मार्गाने विदर्भातून आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात मुकी जनावरे नेली जातात. शनिवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास येथील पोलीस उपनिरीक्षक संतोष माने हे कर्मचाऱ्यांसह रात्र गस्तीवर होते. गस्त सुरू असताना त्यांना काही नागरिकांनी त्यांना या मागाने जनावरांची निर्दयी वाहतूक होत असल्याची माहित दिली. माहिती मिळताच माने आणि पथक केळापूर टोल नाक्याजवळ पोहोचले. तेथे नागपूर ते आदिलाबाद अशी जनावरांची निर्दर्यीपणे वाहतूक होत असल्याचे उघड झाले. तेथे पोलीस पथकाला एम.एच.३०-यू.९८३२ हे बोलेरो पीकअप वाहन उभे आढळले. या वाहनाची तपासणी केली असता, मागच्या बाजूने एक लाल रंगाचा बैल चारही पाय दोरीने टोंगळ्यातून बांधलेला आढळला. त्याच्या शिंगातून रक्तही सांडत होते. वाहनाचा काच फुटलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी आणखी जवळ जाऊन बघितले असता, वाहनात आठ बाय आठ फुटमध्ये दोन वेगवेगळे कक्ष आढळले. या दोन कक्षांमध्ये १५ बैल अत्यंत निदर्यीपणे दोरीने बांधून होते. पहिल्या बैलासारखीच त्यांचीही अवस्था होती. पोलिसांनी लगेच वाहन चालक सदीक खान पप्पू खान (२३), साकीर अहेमद कुरेशी (२२) व अब्दुल अजीज महुम्मद रसीद (३९) तिनही रा. हंसापूरी खदान, नागपूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम ११, तसेच प्राण्यांना निर्दयपणे वागविण्याबद्दल ६६/१९२, १३० (१), (३), १७७ व मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच वाहनामधील १ लाख ६० हजार रूपये किमतीचे १६ बैल आणि २ लाख ४0 हजारांचे वाहन, असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)