शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

विद्युत ब्रेकडाऊनने ग्रामीण जनता वैतागली

By admin | Updated: May 3, 2015 23:56 IST

तालुक्यातील जवळपास सर्वच गावठाण फिडरवर दोन महिन्यांपासून सतत बिघाड होत असून वितरण कंपनी ब्रेक ....

इन्सूलेटर होत आहे निकामी : गावठाण फिडरवर दररोज ‘फॉल्ट’दारव्हा : तालुक्यातील जवळपास सर्वच गावठाण फिडरवर दोन महिन्यांपासून सतत बिघाड होत असून वितरण कंपनी ब्रेक डाऊनच्या नावाखाली १२-१२ तास तर कधी दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित करीत असल्याने ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यात स्वतंत्र गावठाण फिडर योजनेतून कृषीपंप व गावठाणासाठी वेगवेगळी लाईन टाकण्यात आली. गावठाणसाठी नवीन विद्युत खांब व तारांचे काम करण्यात आले. मात्र गाझियाबाद येथील कंपनीने तालुक्यात गावठाणचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने वर्षभरापासून अनेकदा या लाईनमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याने तर कधी साध्या हवेच्या झुळुकीनेही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. गावठाण फिडर योजनेच्या कामात वापरण्यात आलेले इन्सूलेटर हे निकृष्ट दर्जाचे असल्याने वारंवार ते फुटून किंवा लिकेजेसमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.या संदर्भात काही जागरूक नागरिकांनी ऊर्जा मंत्र्यांकडे अनेक लेखी तक्रारीही दाखल केल्या. त्यावर सदर कंपनीच्या कामासंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली हा विषय गुलदस्त्यातच आहे. तालुक्यात दररोज कुठे ना कुठे बिघाड निर्माण होत असून दारव्हा विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व लाईनमन बिघाड दुरुस्तीचे काम दररोज करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. दारव्हा तालुक्याचा भार पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच पडत आहे. एका ठिकाणचा बिघाड दुरुस्त होत नाही तोच दुसऱ्या गावात बिघाड निर्माण झाल्याने दारव्हा पॉवर हाऊसवरून पुरवठा खंडित करण्यात येतो. तो बिघाड दुरुस्त होईपर्यंत इतर गावांमध्ये विद्युत पुरवठाही बंद ठेवावा लागतो. त्यामुळे एकाचवेळी अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठ्याचा पत्ताच नसतो. तालुक्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वीज वितरणमधील बिघाडासंदर्भात अद्याप एकाही लोकप्रतिनिधीने आवश्यक ते लक्ष न घातल्याने ग्रामीण जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा केल्यास मंजूर उपकेंद्राचे काम लवकर सुरू होण्यास मदत होईल. ग्रामस्थांना निश्चित अशा प्रकारांपासून दिलासा केव्हा मिळू शकेल हे सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. (प्रतिनिधी)उकाडा होतोय असह्य, अनेक गावात पाणीटंचाईवीज वितरणची यत्रंणा उदासीनतालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास असताना वीज कंपनीच्या यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते.अनेक गावात नेमकी भर दुपारीच वीज गुल होत असल्याने उकाडा असह्य होत आहे. शेतात राबून घरी आलेल्या कष्टकऱ्यांना गार वारा मिळण्याची व्यवस्थाच गावातून हद्दपार झाली आहे. लाईन नसल्याने घरगुती फॅन व कुलरचाही वापर करता येत नाही. काही ठिकाणी तर भारनियमनामुळे नळयोजना कुचकामी ठरल्या असून, पाणीटंचाईही जाणवत आहे.