बाह्यरुग्ण विभाग प्रशिक्षणार्थींच्या हातीयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. वेळ सकाळी ९ वाजताची. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी. कुणी आॅटोरिक्षाने तर कुणी पायी येत होते. तपासणीची चिठ्ठी काढण्यासाठी धडपड. नोंदणीनंतर भिरभिरत्या नजरेने डॉक्टरांचा शोध. तासभर ताटकळल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून होणारी तपासणी असे काहीसे दृश्य ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोठा आशेचा किरण आहे. प्रत्येक रुग्ण योग्य उपचारासाठी येथे येतो. मात्र या ठिकाणी असलेली यंत्रणा ग्रामीण भागातूनच काय शहरातून आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भंडावून सोडते. उपचारापूर्वी कराव्या लागणाऱ्या सोपस्कारात रुग्ण अर्धमेला होतो. तर नातेवाईक गलितगात्र होवून जातात. वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक आजारासाठी स्वतंत्र विभाग आहे. त्या ठिकाणी विभाग प्रमुखासह तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपस्थित असणे गरजेचे आहे. मात्र काही विभागात डॉक्टर नावपुरतेच दिसत होते. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच रुग्णांवर उपचार करीत होते. नेत्र रुग्ण विभागात सकाळी ११ वाजेपर्यंतही डॉक्टर आले नव्हते. रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत बसले होते. क्ष-किरण विभागात डॉक्टर आले आणि काही क्षणातच परत गेले. त्या ठिकाणी एक्स-रे काढणाऱ्यांची मोठी गर्दी होती. परिचर रुग्णांना रांगेत उभे राहण्याच्या वारंवार सूचना देत होता. मात्र डॉक्टर नसल्याने रुग्ण संतापल्याचे दिसत होते. शल्यचिकित्सा विभागाच्या पुरुष कक्षात ११.३० वाजेपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. यातील एक कक्ष बंद होता. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर पुन्हा औषधीसाठी रांग लावावी लागत होती. दीर्घ काळ प्रतीक्षेनंतर रुग्णांच्या हातावर चार दोन गोळ्या पडत होत्या. तपासणीनंतर गंभीर रुग्णांना वॉर्डात दाखल केले जाते. मात्र वॉर्डात नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध असले तरी कर्मचारी मात्र दिसत नव्हते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक स्ट्रेचर ढकलतानाचे चित्र दिसून आले. सकाळी ९ वाजतापासून ११.३० वाजेपर्यंत रुग्ण नोंदणी कक्षासह सर्वच विभागसमोर रुग्णांच्या रांगा होत्या. आजाराने गलितगात्र झालेले रुग्ण जागा मिळेल तिथे बस्ताण मांडत होते. त्यांचे नातेवाईक डॉक्टरांचा शोध घेत होते. पुसदधील डॉक्टर लेटलतिफउपजिल्हा रुग्णालयात सकाळी ९ वाजता भेट दिली असता तेथील असुविधांचा आलेखच पुढे आला. सहापैकी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. १०.३० नंतर एक-एक डॉक्टर रुग्णालयात आले आणि नंतर सुरू झाली जुजबी तपासणी. उपचारासारखीच येथील परिसराचीही अवस्था आहे. पुसद उपजिल्हा रुग्णालयात सहा डॉक्टर आहे. त्यापैकी तीन एमबीबीएस तर एक नेत्र तज्ज्ञ आहे. एक स्त्री रोग तज्ज्ञ असून एका महिला डॉक्टरने राजीनामा दिल्याचे सांगितले गेले. फिजिशियन आणि सर्जन नसल्याने येथे विषबाधा झालेले रुग्ण, हृदयरोग, अपेंडीक्स, मुत्रपिंड, हर्निया आदी रुग्णांवर उपचार होत नाही. त्यामुळे तात्पुरते उपचार करून त्यांना यवतमाळचा रस्ता दाखविला जातो. रेडिओलॉजिस्ट नसल्याने सोनोग्राफी मशीन बंद आहे. रुग्ण बाहेरून सोनोग्राफी करून आणताना दिसून आले. येथील एमबीबीएस डॉक्टर डिप्लोमा नसताना ट्रेनिंग बेसवर बाळंतपण आणि सिजर करताना दिसून आले. गेल्या वर्षी १०० खाटांची मान्यता मिळाली. मात्र आजही ५० खाटांवरच काम भागविले जाते. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक जे.एल. सूर्यवंशी यांची भेट झाली. त्यांना येथील अडचणींबाबत माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले, येथे स्वच्छतेसाठी सहा कर्मचारी आवश्यक आहे. परंतु दोनच कर्मचारी आहे. वरिष्ठांनी कंत्राटी पद्धतीने स्वच्छता कर्मचारी देण्याचे कबुल केले. परंतु अद्यापही तो प्रश्न कायम असल्याचे सांगितले. औषधांचा साठा मुबलक असून ठेवण्यासाठी मात्र जागा नाही. मेडिसिन
ग्रामीण रुग्णालये झाली ‘रेफर टू’
By admin | Updated: June 26, 2014 23:33 IST