शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी घेतला विभागप्रमुखांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेतील अनुपालन अहवालाबाबत सदस्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरही कामाची पद्धत सुधारलेली नाही. ही बाब सदस्यांनी निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे यासाठी त्यांच्याकरिता कार्यशाळा घ्या, अशी उपरोधिक मागणी केली. प्रशासन प्रमुखाचे नियंत्रण नसल्याने अंतर्गत कुरघोडी सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हा परिषद प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे विभागप्रमुखासह अधिनस्त यंत्रणा मनमर्जीने कारभार चालवत आहे. हीच बाब मंगळवारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी मांडली. ठराव घेतल्यानंतरही त्याच्या अनुपालनाचा अहवाल का सादर केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून सदस्यांनी विभागप्रमुखांचा क्लास घेतला. जिल्हा परिषदेतील अनुपालन अहवालाबाबत सदस्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरही कामाची पद्धत सुधारलेली नाही. ही बाब सदस्यांनी निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे यासाठी त्यांच्याकरिता कार्यशाळा घ्या, अशी उपरोधिक मागणी केली. प्रशासन प्रमुखाचे नियंत्रण नसल्याने अंतर्गत कुरघोडी सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आता कठोर भूमिका घेण्याची गरज आहे, अन्यथा अशा सभा कितीही झाल्या तरी त्याला अर्थ उरणार नाही, अशाही शब्दात सदस्यांनी आपला संताप व्यक्त केला.  या वादळी सभेनंतर कारभार किती सुधारतो याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, सभापती राम देवसरकर, श्रीधर मोहोड, विजय राठोड, जया पोटे, सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे आदी उपस्थित होते. 

अध्यक्षांनाही बसला बिरोक्रसीचा फटका - जिल्हा परिषदेतील प्रशासन ढासळल्याचा फटका अध्यक्षा कालिंदा पवार यांना बसला. अध्यक्षांचे वाहन काही दिवसांपासून नादुरुस्त आहे. ते तातडीने दुरुस्त व्हावे, असे निर्देशही दिले. मात्र, त्यानंतरही यावर संबंधितांनी कार्यवाही केली नाही. परिणामी मंगळवारच्या स्थायी समिती सदस्यांना अध्यक्षांना दुचाकीवरून जिल्हा परिषदेत यावे लागले. सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांनीसुद्धा एकूणच कारभारावर तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.   

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद