शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली

By admin | Updated: January 28, 2015 23:42 IST

शहरात राजरोसपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. दारू दुकाने उघडी ठेवण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे. मात्र त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत ही दुकाने सुरूच असतात.

उमरखेड : शहरात राजरोसपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. दारू दुकाने उघडी ठेवण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे. मात्र त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत ही दुकाने सुरूच असतात. यामुळे शहराच्या समाजस्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत आहे. शहरातील किरकोळ मद्यविक्रेत आदेशाचे उल्लंघन करून सकाळी ५ वाजता आपली दारु दुकाने उघडून रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे. उत्पादन शुल्क अधिकारी तसेच पोलीस अधिकारी मात्र आपसी संबंध जोपासत या एकूणच प्रकाराकडे सोईस्कर कानाडोळा करून आहेत. शहरात पाच बीअर बार व शहरालगत बीअर बार, दोन वाईन शॉप आहेत. चार देशी दारु विक्रीचे परवानाधारक आहेत. देशी दारु दुकाने उघडण्याची निर्धारित वेळ सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंतच आहे. परंतु शहरातील दारु दुकाने चक्क ५ वाजताच उघडण्यात येऊन त्यासमोर मद्यशौकिनांच्या रांगा लागताना दिसतात. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना भल्या पहाटेच हे चित्र पहायला मिळते. अगदी सकाळी ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी बाहेर पडतात. त्यांच्या नजरेला हे दृष्य पडते. कित्येक प्रसंगी त्यांना नाकाला रुमाल लावून मार्गाक्रमण करावे लागत. विशेष म्हणजे रस्ते सुरक्षा पथकाला देखील हे ‘गुड मॉर्निंग’चे दृष्य पहायला मिळते. परंतु ते ही याकडे कानाडोळा करताना दिसतात. नागरिकांना मानसिक स्वास्थ्य मिळावे म्हणून दारु दुकाने उघडण्याच्या तथा बंद करण्याच्या वेळा निश्चित केलेल्या असूनही अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या मधूर संबंधातून आदेशाची अवहेलना होत आहे. अगदी पहाटेच मद्द शौकिनांची दारुने सुरुवात होत असून, व्यसनाधिनता वाढीस लागून सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याने यावर निर्बंध लावावेत, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)