शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य वेतनाचा धडाका

By admin | Updated: September 1, 2014 00:17 IST

येथील नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य वेतन काढण्याचा धडाका सुरू आहे़ मात्र यावर कुणाचाही वचक नसल्याने नगरपरिषद व शासनाचे प्रचंड नुकसान होत आहे.

नगरपरिषद वणी : उपसंचालकांकडून तक्रार बेदखलवणी : येथील नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य वेतन काढण्याचा धडाका सुरू आहे़ मात्र यावर कुणाचाही वचक नसल्याने नगरपरिषद व शासनाचे प्रचंड नुकसान होत आहे.नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती लागू नसतानाही ती सन २००२ पासून कर्मचाऱ्यांना देण्यात आली़ त्याची वसुली करण्याचे आदेश तत्कालीन उपसंचालकांनी दिले होते. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांकडून पूर्णपणे वसुली करण्यात आली नाही़ कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजेच्या काळातील नक्षलग्रस्त भत्ता व वाहन भत्ताही काढण्यात आला आहे. नगरपरिषदेचा ठराव नसतानाही कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता, वाहन भत्ता व काही कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतीपूर्ती देयके काढण्यात आली आहे. केवळ २० टक्के शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर असताना सरसकट सर्वच निवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात आली आहे. यापैकी अनेकांनी वरिष्ठ श्रेणी नंतर १२ वर्षांची सेवाही केली नाही़ आपली शैक्षणिक पात्रताही वाढविली नाही़ तरीही त्यांना लाभ देण्यात आला. नगरपरिषद शाळेत २०० पेक्षा कमी विद्यार्थी असतानाही मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणी देण्यात आली़ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासीत योजना लागू नसतानाही, ती देण्यात आली़ शिक्षक व शिक्षकेतरांनी घेतलेल्या अग्रीमाचे समायोजन करण्यात आले नाही़ लेखा परीक्षकांनी काही शिक्षकांच्या चुकीच्या वेतनश्रेणीची वसुली करण्याचे आदेश गेल्या २८ जूनला दिले होते़ मात्र वेतनात सुधारणा करून अद्याप त्याची वसुली करण्यात आली नाही़ या सर्व बाबींबाबत स्विकृत सदस्य पीक़े़ टोंगे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली आहे़ तत्पूर्वी शिक्षण उपसंचालकांनी २१ मे २०१३ च्या पत्रानुसार चार अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले़ परंतु या चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांच्या कार्यप्रणालीवरच आता शंका घेण्यात येत आहे़ शिक्षण उपसंचालक राम पवार यांच्याच वर्तनाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी टोंगे यांनी शिक्षण सचिवांकडे तक्रारीतून केली आहे. त्यावर आता शासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)