शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी

By admin | Updated: August 7, 2014 00:04 IST

तालुक्यात यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची स्थिती वाईट आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची पाळी आली आहे. याही परिस्थितीत शेतात

मुकेश इंगोले - दारव्हातालुक्यात यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची स्थिती वाईट आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची पाळी आली आहे. याही परिस्थितीत शेतात लागवड केली. कशीबशी पिकेही उभी राहिली. परंतु आता मात्र वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दारव्हा तालुक्यातील पाच हजारांपेक्षा जास्त क्षेत्रावरील उभे पीक वन्य प्राण्यांनी फस्त केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या वनपरिक्षेत्रात दोन हजार दोनशे ४० हेक्टर खासगी शेतजमीन वनजमिनीला लागून आहे. सध्या जंगलात चारा व पिण्याचे पाणी नसल्याने वन्यप्राणी शेतात घुसतात व त्यामधील पिके उद्ध्वस्त करतात. शेतातील पीक वन्यप्राण्यांनी खाल्ल्याच्या असंख्य तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.यावर्षी तालुक्याला सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर १६ व १७ जूनला बऱ्यापैकी पाऊस झाला. या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जुलै महिन्यात दोनदा काही दिवस पावसाने झड लावली. परंतु दमदार पाऊस झालाच नाही. आॅगस्टमध्येसुद्धा अशीच स्थिती आहे. आतापर्यंत तालुक्यात फक्त २८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पाऊस कमी प्रमाणात पडल्याचा दुष्परिणाम शेतातील पिकांवर झाला. परंतु शेतकऱ्यांनी मात्र न डगमगता अशाही परिस्थितीत शेतात पेरणी केली. ड्रिप, स्प्रिंकलरच नव्हे तर चक्क गुंडाने, ग्लासने पाणी टाकून पिके जगविली. परंतु आता मात्र पिकांना वन्यप्राण्यापासून कसे वाचवावे, या काळजीत शेतकरी आहेत. कारण जंगलात प्राण्यांना खायला चारा नाही. कमी पावसामुळे पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे प्राणी मोठ्या प्रमाणात शेतांकडे धाव घेत आहे.रोही, रानडुक्कर, काळवीट, हरिण या प्राण्यांची कळपच्या कळप शेतात घुसतात व रात्रीतून संपूर्ण शेत फस्त करतात. शेतकरी दिवसा पिकांची राखन करतात. परंतु पावसाळा असल्यामुळे रात्रीला शेतात थांबणे शक्य नाही आणि रात्री जागल केली तरी अनेकदा अंधारात वन्यप्राणी दिसतही नाही. ज्यांची परिस्थिती आहे अशांनी शेताला कुंपन केले. परंतु कुंपनाचे बजेट मोठे असल्याने ते अनेकांना शक्य होत नाही. फुबगाव, नखेगाव, कुंड, पाथ्रड, किन्ही वळगी, शिंदी, करजगाव, महागाव, रामगाव, धनगरवाडी, बोदेगाव, सांगवी, तोरनाळा, खोपडी यासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी करण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शासनाने वनजमिनीला तार कुंपन करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावावा आणि नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.