रूईगाठींचा ट्रक भस्मसात : राळेगाव येथील वसंत सहकारी जिनिंगमध्ये रुई गठाणीच्या ट्रकला गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता आग लागली. हा ट्रक बाहेर जात असताना प्रवेशद्वारावरील वीज तारांना स्पर्श होवून स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येते. या ट्रकमध्ये १०० रुईगाठी होत्या. त्यापैकी ५० रुईगाठी जळाल्याचा अंदाज आहे. वृत्तलिहिस्तोवर अग्निशमन दल पोहोचले नव्हते.
रूईगाठींचा ट्रक भस्मसात :
By admin | Updated: April 14, 2017 02:39 IST