कागदपत्रांची तपासणी : प्रमाणपत्रावर स्वाक्षरीस टाळाटाळयवतमाळ : ‘डबल पायडल’ म्हणून ट्रान्सपोर्ट क्षेत्रात ओळख असलेल्या एका अधिकाऱ्याने एक महिन्यांपासून जाणीवपूर्वक प्रकरणे थांबवून ठेवली. ‘लोकमत’ने त्यावर प्रकाशझोत टाकताच अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन गुरुवारी यवतमाळच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयात धडक देत कागदपत्रांची तपासणी केली. स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन निरीक्षकांकडून वाहनाच्या फिटनेस प्रमाण पत्रावर स्वाक्षरी देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यासाठी पैशाची मागणी होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत अमरावती विभागीय परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांनी गुरूवारी दुपारी यवतमाळ आरटीओ कार्यालय गाठले. त्यांनी वाहन पासिंग आणि फिटनेस प्रमाणपत्र दिल्याबाबतचे संपूर्ण रेकॉर्ड तपासले. त्यांनी संबंधित वाहन निरीक्षकांची चांगलीच झाडा झडती घेतली.येथील ट्रक मालक हाजी अहेमद यांनी त्यांचा ट्रक फिटनेस प्रमाणपत्रासाठी १६ जानेवारीला पासिंग करून घेतला. त्यावेळी वाहन निरीक्षकाने कोणत्याच त्रृट्या काढल्या नाही. नंतर फिटनेस प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. त्यांना थेट पैशाची आॅफर केली गेली. ट्रकमध्ये कोणतीच उणीव नसताना केवळ स्वाक्षरीसाठी पैसे का द्यायचे, असे म्हणून हाजी अहेमद यांनी जाब विचारला. यामुळे सेतप्त झालेल्या निरीक्षकाने हे प्रकरण तब्बल एक महिन्यापर्यंत प्रलंबित ठेवले. यामुळे फिटनेस प्रमाणपत्र नसल्याने हाजी अहेमद यांना व्यावासायीक नुकसान होत होते. त्यामुळे शेवटी संतापून त्यांनी १३ फेब्रुवारीला संबंधित वाहन निरीक्षकास त्याच्याच कक्षात डांबले.या गंभीर प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने १५ फेब्रुवारीला प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांनी गुरूवारी दुपारी यवतमाळ कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केली. या वाहन फिटनेस पासिंगच्या आॅनलाईन नोंदी पाहण्यात आल्या. प्रमाणपत्र नेमके कधी दिले, वाहनाची पासिंगासाठी तपासणी कधी केली, या सर्व बाबींची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्या वाहन निरीक्षकाची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. आता वाहन निरीक्षकावर कोणती कारवाई केली जाते, याची आटीओ वर्तुळात चर्चा सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आरटीओची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धडक
By admin | Updated: March 3, 2017 02:00 IST