शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बारदाना आला, पण जागाच नाही

By admin | Updated: March 17, 2017 02:44 IST

बारदान्याअभावी रखडलेली तुरीची खरेदी आता जागेच्या अभावाने संकटात सापडली. जागेच्या समस्येवर

सरकारी भूमिका शंकास्पद : यवतमाळ, बाभूळगावला गोदामच नाही यवतमाळ : बारदान्याअभावी रखडलेली तुरीची खरेदी आता जागेच्या अभावाने संकटात सापडली. जागेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याच्या मंजुरीनंतरच तूर खरेदीची समस्या सुटणार आहे. त्यामुळे खरेच सरकार तूर खरेदी करणार का, असा प्रश्न तूर उत्पादकांना सतावत आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून तूर खरेदीने उग्ररूप धारण केले आहे. बाजार समितीच्या सभापतींनी प्रथम बारदाना आंदोलन केले. खरेदी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यानंतरही शासकीय यंत्रणा ही समस्या गांभीर्याने सोडविण्यास तयार नाही. बारदाना घेऊन निघालेला एक ट्रक जिल्ह्यात दाखल झाला अन् पुन्हा नव्या संकटाला सुरूवात झाली. बारदाना येताच सीडब्लूसीने जागा नसल्याचे कारण सांगत तूर ठेवण्यास नकार दिला. परिणामी बारदाना मिळूनही तूर खरेदी थांबली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दारव्हा रोडवरील शासकीय गोदामात तूर साठवली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला आणखी किमान दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. शासकीय खरेदीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी आता धीर सोडला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने तुरीचे नुकसान होत आहे. (शहर वार्ताहर) राळेगाव केंद्र बंद, आर्णीत बारदानाही नाही यवतमाळ व बाभूळगाव केंद्रावर तूर खरेदीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या दोन्ही ठिकाणी बारदाना उपलब्ध आहे. मात्र आता जागा नाही. आर्णी केंद्रावर जागा आहे, मात्र बारदाना नाही. राळेगावचे केंद्र एफसीआयने बंद केले आहे. व्हीसीएमएसची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव तथापि खरेदी झालेली तूर ठेवण्यासाठी यवतमाळ केंद्राकडे जागाच नाही. यामुळे यवतमाळचे व्हीसीएमएसचे केंद्र अडचणीत सापडले आहे. या ठिकाणी बारदाना असला तरी जागाच नसल्याने तूर ठेवायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी अडचणीत सापडले आहे. त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.