यवतमाळ : रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा ११ जुलै रोजी मातोश्री दर्डा सभागृहात उत्साहात झाला. नीलेश ढुमे यांनी अध्यक्षपदाचा तर सुनील खडसे, अतुल मांगूळकर यांनी सचिवपदाचा पदभार स्वीकारला.प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल संजय मेश्राम, महेश मोकलकर, अविनाश ओमनवार उपस्थित होते. गोपाल बोरेले यांनी मागील वर्षीचा आढावा घेतला. क्लबचे ९ सदस्य पॉल हॅरीस फेलो झाल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनने घेतलेल्या एज्युफेस्ट प्रकल्पास रोटरी इंटरनॅशनल अवॉर्ड जयप्रकाश जाजू, परेश लाठीवाला, विजय शेटे यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी अध्यक्ष गोपाल बोरेले व सचिव गोपाल अग्रवाल यांनाही रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० अवॉर्ड प्रदान करण्यात आला. अमित चोखाणी यांच्यातर्फे गरीब विद्यार्थिनींना २४ सायकलींचे वाटप करण्यात आले. समीक्षा जाधव व रिया कासट यांचाही सत्कार करण्यात आला. प्रयासच्या मिशन डिप निळोणाला सहकार्य करण्याची घोषणा नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश ढुमे यांनी केली. तसेच प्रयासला एक लाख एकावन्न हजारांचा धनादेशही यावेळी प्रयासला हस्तांतरित करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या खडसे, राखी लाठीवाला, हरप्रित ओबेरॉय यांनी केले. तर आभार सुनिल खडसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी जयप्रकाश जाजू, विजय अडतीया, परेश लाठीवाला, विजय शेटे, उत्पल टोंगो, अजय भूत, किशोर जाजू यांनी विशेष परिश्रम घेतले.
रोटरी क्लब मिडटाऊनचे पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 02:33 IST