शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक गुन्हेशाखेसाठी रस्सीखेच

By admin | Updated: June 7, 2014 01:57 IST

मिनी एसपी म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी

दिग्रसचे संजय देशमुख आघाडीवर : दारव्हा, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदारही स्पर्धेत यवतमाळ : मिनी एसपी म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी वर्णी लावून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू  आहे. त्यात दिग्रसचे ठाणेदार संजय देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. प्रल्हाद गिरी यांची बदली झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पद रिक्त  आहे. जिल्ह्यातील जुने अधिकारी आणि नव्याने बाहेरुन बदलून आलेल्या  अधिकार्‍यांचा या पदावर डोळा आहे. त्यासाठी सर्वांनीच आपआपल्या परीने लॉबिंग सुरू केली आहे. कुणी राजकीय मार्गाने तर कुणी प्रशासकीय  मार्गाने फिल्डींग लावली आहे. त्यात सध्या तरी दिग्रसच्या संजय देशमुख यांनी आघाडी घेतल्याचे सांगितले जाते. त्यांच्यासाठी अमरावतीमधील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका निलंबित नेत्याने आपले वजन वापरल्याची माहिती आहे. या नेत्याला पोलीस प्रशासनाकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याने  संजय देशमुख यांची एलसीबीतील वर्णी निश्‍चित मानली जात आहे. याशिवाय दारव्हा आणि यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदारही जोर लावून आहेत.  यवतमाळ ग्रामीणच्या ठाणेदारांनी तर साहेबांसोबतच्या आपल्या जुन्या कार्यकाळाचा हवाला देत आपली वर्णी निश्‍चित असल्याचा दावा केला आहे.  याशिवाय एका मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील ठाणेदारासाठी थेट महानिरीक्षकांशी संपर्क साधल्याचे पोलीस वतरुळात बोलले जाते. मात्र महानिरीक्षकांनी  ठाणेदारांच्या नियुक्त्या या एसपींच्या अधिकारातील बाब असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करणार नाही, चुकीचे होत असेल तरच ते निदर्शनास आणून  देऊ, अशी भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले. या मंत्र्यांच्या शिफारसीवरून यापूर्वी पांढरकवडा येथे ठाणेदार नेमण्यात आले होते. मात्र त्यांना आता  नियंत्रण कक्षात बसविले गेले. यवतमाळ ग्रामीणच्या ठाणेदाराला एलसीबीसाठी येथील जुन्या लॉबीचे पाठबळ असल्याचीही चर्चा आहे.                   (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या कारभारावर पुसद, वणी, पांढरकवडा येथील ठाणेदार नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यांना वाहतूक  शाखा प्रमुखांचा आपल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप नको आहे. आठवडाभरापूर्वी पांढरकवडा ठाणेदार व वाहतूक पोलीस निरीक्षकात याच कारणावरून  वाद झाल्याचे सांगितले जाते. वाहतूक पोलीस निरीक्षक विरुद्ध अन्य प्रमुख ठाणेदार असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.