शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

निम्न पैनगंगा प्रकल्पावर केंद्रीय राज्यमंत्र्यांची भूमिका संदिग्ध

By admin | Updated: July 6, 2015 02:36 IST

तालुक्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदीवर चिमटा येथे धरण प्रस्तावित आहे. या धरणा ऐवजी येथे शिरपूर पॅटर्न राबवून बॅरेजेस उभारण्यात यावे,....

आर्णी : तालुक्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदीवर चिमटा येथे धरण प्रस्तावित आहे. या धरणा ऐवजी येथे शिरपूर पॅटर्न राबवून बॅरेजेस उभारण्यात यावे, या मागणीसाठी धरण विरोधी संघर्ष समितीचा लढा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार हंसराज अहीर यांनी धरणाला विरोध करून परिसरातील जनमताचा पाठिंबा मिळविला होता. आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी भूमिका बदलविली आहे. उघडपणे विरोधात बोलायला तयार नाही, असा आरोप धरणविरोधी संघर्ष समितीचे अ‍ॅड़ बालाजी येरावार यांनी आर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. निम्न पैनगंगा धरणासंदर्भात पांढरकवडा येथील एका कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी धरण होण्यासंदर्भात भूमिका मांडली होती. यावरून धरणविरोधी समिती मॅनेज झाली, धरण विरोधी समितीमध्ये फुट पडली अशी टिका समितीवर होऊ लागली होती. याचा खुलासा करण्यासाठी धरणविरोधी समितीने आर्णी येथील विश्रामगृहावर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निम्नपैनगंगा धरण बांधण्याऐवजी तेथे बॅरेजस, बुडीत व लाभक्षेत्रातील नाल्यावर शिरपूर पॅटर्न, सर्व वनजमिनीवर साठवण तलाव बांधून सिंचनाचा प्रश्न सोडवावा. यातून आर्थिक, तांत्रिकदृष्ट्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाचे नुकसार टाळता येणार आहे, असा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांपुढे केला आहे. मात्र त्यांनी या प्रस्तावावर कुठलीही उघड भूमिका मांडली नाही. उलट धरण होण्याकडेच त्यांचा कल दिसून आला. यामुळे धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जगताप, अ‍ॅड़ बालाजी येरावार, विजय राऊत, मुबारक तवंर या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देऊन निर्णयाबाबत पुनरविचार करावा अशीही मागणी केली. केंद्रीय मंत्र्यांनी बोलण्याचे टाळल्यानंतर बालाजी येरावार यांनी आपला संताप व्यक्त करत धरणाला विरोध कायम राहील असाही निर्धार केला. (शहर प्रतिनिधी)