शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी पालिकेचे उपाध्यक्ष व सदस्य कारकुनाच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:55 IST

कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याने शहराचा विकास थांबला आहे. तरीही शासनाकडून पदभरतीकडे दुर्लक्ष सुरू आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची टंचाई : दहा वर्षांपासून पदभरतीच नाही, विकास खोळंबला

आॅनलाईन लोकमतघाटंजी : कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याने शहराचा विकास थांबला आहे. तरीही शासनाकडून पदभरतीकडे दुर्लक्ष सुरू आहे. कामे होत नसल्याने नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लिपिकांची कामेही पदाधिकाऱ्यांना करावी लागत आहे. याच बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी खुद्द उपाध्यक्ष शैलेश ठाकूर आणि काही नगरसेवकांनी प्रत्यक्ष कारकुनाची कामे केली. लिपिकांच्या खुर्चीत बसून त्यांनी या पदांची जबाबदारी सांभाळली.नगरपरिषदेची निवडणूक होऊन वर्षभराचा कालावधी लोटला. मात्र लोकांच्या समस्या सोडविल्या जात नाही. दररोज तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. पालिकेत अपुरे कर्मचारी आहे. कामे होत नसल्याने नागरिक पदाधिकाºयांकडे धाव घेत आहेत. मागील दहा वर्षांपासून नगरपरिषदेत पदभरती झालेली नाही. यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांना पालिकेच्या कामकाजाची माहिती, योजना, आवश्यक कागदपत्र अशा प्रकारची कामे पदाधिकाºयांना कार्यालयात बसून करावी लागत आहे. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी पालिकेत पदभरतीसाठी संचालकांकडे पत्रव्यवहार केला. काही दिवसांपूर्वी नगरपरिषद कार्यालयाला कुलूप लाऊन जिल्हाधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. तरीही पदभरतीविषयी काहीही हालचाली झालेल्या नाही. सोमवारी उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, नगरसेवक सैयद फिरोज यांनी बाबूच्या खुर्चीत बसून लोकांच्या अनेक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. अर्ज लिहून देण्यापर्यंतची कामेही त्यांनी केली. शहराच्या विकासाकरिता कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचे शैलेश ठाकूर यांनी सांगितले.