शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोचे आधारकार्ड लिंकेज खोळंबले

By admin | Updated: January 27, 2015 23:40 IST

रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या मजुरांची ओळख पटविण्यासाठी आता आधार कार्डचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी मजुरांचे जॉब कार्ड आणि आधार कॉर्ड लिंकेज करण्यात येत आहे.

यवतमाळ : रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या मजुरांची ओळख पटविण्यासाठी आता आधार कार्डचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी मजुरांचे जॉब कार्ड आणि आधार कॉर्ड लिंकेज करण्यात येत आहे. मात्र ही मोहीम रखडल्याचे दिसू असून एक लाख ५७ हजार ६९२ मजरा पैकी केवळ ६८ हजार मजुरांचे बँक खाते, जॉब कार्ड, आधार कार्डशी जोडण्यात आले आहे. मजुुरांचे आधार कार्ड हे एमआयएस (मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टीम) सोबत जोडले जात आहे. रोहयोवर यापूर्वी अनेक बोगस मजूर दाखवुन मशीनद्वारेच कामे उरकण्यात आली. अनेक कामावर मयत व्यक्तीला मजूर म्हणून दाखविण्यात आल्याचे उघड झाले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामात कंत्राटदारांनी केलेली घुसखोरी थांबविण्यासाठीच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून विविध उपाय योजना केल्या जात आहे. या अंतर्गतच एमआयएस प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. थेट उपग्रहाच्या माध्यमातून कामाचे ठिकाण निश्चित केले जात आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष कामावर राबणाऱ्या व्यक्तीलाच मोबदला मिळावा याची तसदी शासनाकडून घेण्यात आली आहे. यासाठी सामाजिक अंकेक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रथमच लेबर बजेट करण्यात आले. यातूनच आधार कॉर्ड एमआयएस सोबत जोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ज्या अपेक्षेने हे काम सुरू केले होते. ते उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)