शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी तालुक्यात रोही, रानडुकरांचा हैदोस

By admin | Updated: September 18, 2015 02:26 IST

आर्थिक अडचणीवर मात करूनही यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांच्या हिंमतीचा परिपाक म्हणजे,

शेतकरी बेजार : ज्वारी, सोयाबीन, कापसाला फटका, वनविभागाने लक्ष देण्याची गरज घाटंजी : आर्थिक अडचणीवर मात करूनही यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांच्या हिंमतीचा परिपाक म्हणजे, बेभरवशाच्या पावसातही यंदा पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, वन्यप्राण्यांनी आता हाती आलेले पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे तालुकाभरातील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रोही आणि रानडुकरांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. प्रामुख्याने मानोली, पाटापांगरा, शिरोली, दहेगाव, उंदरणी, जुनोनी, आमडी, पंगडी आदी परिसरात वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात उपद्रव माजविला आहे. याबाबत शेतकऱ्यांची ओरड वाढलेली असूनही वनविभाग या समस्येकडे लक्ष पुरविण्यास मात्र तयार नाही. शिरोली येथील शेतकरी नंदकिशोर पायताडे यांच्या शेतातील संपूर्ण ज्वारीचे हाती आलेले पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त करून टाकले आहे. उधार उसनवारी करून पेरलेली ज्वारी आता बहरली होती. काही दिवसांतच हे पीक शेतकऱ्याच्या हाती येणार होते. मात्र, ऐनवेळी रानडुकरांनी त्यांच्या शेतात शिरकाव केला. त्यांच्या शेतातील संपूर्ण ज्वारीचे पीक आडवे पडले आहे. आता कर्जफेडीची चिंता या शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे वनविभागाने शेतपिकाच्या नुकसानीची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या परिसरात जंगल क्षेत्र असल्याने बिबट्यासह रोही, रानडुकर या वन्यप्राण्यांचा सदैव वावर असतो. वानरांमुळे या भागातील शेतपिके दरवर्षीच बाधीत होतात. (तालुका प्रतिनिधी)